MANOJ JARANGE PATIL : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांनी मुंबईतील आझाद मैदानावर आंदोलन सुरु केलंय. आज सकाळी मोठं (MANOJ JARANGE PATIL) शक्तिप्रदर्शन करत मनोज जरांगे-पाटील यांनी मुंबई गाठली. मला गोळ्या घातल्या तरी चालतील पण समाजाच्या मागण्या पूर्ण केल्याशिवाय मागे हटणार नाही असं मनोज जरांगे पाटील यांनी म्हंटल. उपोषण स्थळावरून पहिल्यांदाच बोलताना त्यांनी नेमकं काय म्हटलं पाहूयात
जरांगे मुंबईत येण्यापूर्वीच मुंबईतलं आझाद मैदान भरगच्च झालं होतं. हजारोंच्या संख्येने आंदोलक उपस्थित झाले होते. सकाळी 10 वाजण्याच्या सुमारास जरांगेंनी उपोषणाला सुरुवात केली. मागण्या पूर्ण होईपर्यंत मुंबई न सोडण्याचा निर्धार मनोज सरांगे पाटील यांनी केला. उपोषणाला सुरुवात करतात जरांगे पाटील (MANOJ JARANGE PATIL) यांनी सरकारला गर्भित इशारा दिला. मागणीची अंमलबजावणी होईपर्यंत मुंबई कदापि सोडणार नाही. “सरकारनं मला गोळ्या घातल्या तरी मागे हटणार नाही. जेलमध्ये टाकलं तरी जेलमध्ये सुद्धा आमरण उपोषण करणार” असल्याचा इशारा जरांगे पाटील यांनी हजारो मराठा आंदोलकांसमोर दिला. यावेळी बोलताना पाटील म्हणाले की, मुंबई आज मराठ्यांनी जाम करून दाखवली आहे. मात्र सरकारने आपल्याला सहकार्य केले आपल्याला आंदोलनाची परवानगी दिली आहे त्यामुळे आपण सुद्धा पोलिसांना आणि सरकारला सहकार्य करणार आहोत. असं मनोज जरांगे पाटील यांनी म्हटलं. आंदोलनाला कोणतेही गालबोट लागेल असं वागू नका. असं आवाहन देखील आंदोलकांना जरांगे पाटील यांनी केलं. यावेळी आंदोलकांसोबत बोलताना त्यांनी मराठी आंदोलकांना कळकळीचं आवाहन केलं, कुठेही दगडफेक करू नका ! पोलीस जी जागा देतील त्या ठिकाणी गाड्या पार्क करा आणि पुढील दोन तासात मुंबई मोकळी करा. असा आवाहन सुद्धा त्यांनी केलंय. दारू पिऊन धिंगाणा करू नका समाजाला मान खाली घालावी लागेल असं कोणतंही वर्तन करू नका जोपर्यंत आपल्या डोक्यावर विजयाचा गुलाल पडत नाही तोपर्यंत आपण इथं इथून हटणार नसल्याचं सुद्धा मनोज जरांगे पाटील यांनी सांगितलं. ते पुढे म्हणाले की कोण काय सांगताय, कोण राजकीय पोळी भाजतय त्यासाठी कोणी आपल्या आंदोलनातचा वापर करताय का ? हे गांभीर्याने पाहून घ्या असंही ते म्हणाले. आंदोलनाला बट्टा लावायचा नाही मी मरण पत्करायला तयार आहे पण माग हटायचं नाही असं त्यांनी सांगितलं. जोपर्यंत आपल्याला विजय मिळत नाही तोपर्यंत आपण इथून हटणार नसल्याचंही ते म्हणाले
AZAD MAIDAN : मराठ्यांचं वादळ आझाद मैदानावर धडकणार, आझाद मैदानाचा नेमका इतिहास काय?
मुंबईच्या आझाद मैदानावर मराठ्यांचं भगवं वादळ थडकलय… मोठ्या संख्येने मराठा आंदोलन इथे उपस्थित झालेले आहेत आणि मनोज जरांगे पाटील यांनी स्वतः मराठ्यांना आरक्षण दिल्याशिवाय मागे हटणार नाही असा निर्धार केलाय. एवढेच नाही तर अनेक आंदोलकांनी तयारी सह इथं आल्याचं बोलूनही दाखवलय. त्यामुळे आता या आंदोलनाचं पुढे काय होतं आणि सरकार या आंदोलकांशी मागणी पूर्ण करणार का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. जरांगे पाटील यांच्या आंदोलनासंदर्भातली प्रत्येक अपडेट आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहोत तोपर्यंत पाहत रहा टॉप न्यूज मराठी आपला महाराष्ट्र आपली बातमी