DAUND ACB NEWS: पुण्याच्या दौंडमधून एक धक्कादायक प्रकार समोर येतोय…
दौंडच्या भूमी अभिलेख कार्यालयामध्ये दोन कर्मचारी
लाच घेताना लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात….
मिळालेल्या माहितीनुसार फिर्यादीयाचा वडिलोपार्जित जमीनीचा
दावा दौंड न्यायालयात सुरू होता, तक्रारदारकाच्या
सामायिक जमिनीचा हिस्सा ठरवून देण्यासाठी जिल्हाधिकारी यांना जमिनीचे वाटप करून घेण्याबाबत आदेश केल्यानंतर
यामध्ये उपाधीक्षक भुमी लेख दौंड यांना तक्रारदारकाच्या सामायिक जमिनीची मोजणी करून वाटप करिता आदेश केले होते,
हे प्रकरण दौंडच्या उपाधीक्षक भूमि अभिलेख दौंड यांच्या कार्यालयाकडे आल्यानंतर यामध्ये लोकसेवक महिला परीक्षण भूमापक उपाधीक्षक भूमि अभिलेख
या कर्मचारी यांनी जमिनीच्या मोजणीचा अहवालासाठी तक्रारधारकाकडे 15,000/- रुपये लाचेची मागणी केली होती.
लाचलुचपत प्रतिबंधक मुंबईचे अप्पर पोलीस आयुक्त संदीप दिवाण EXCLUSIVE
यावेळी तक्रारधारकाने 4 ऑगस्ट 2025 रोजी लाच लचपत प्रतिबंधक विभाग पुणे यांच्याकडे तक्रार केली होती.
तक्रारधारकाच्या अनुषंगाने 11 ऑगस्ट 2025 रोजी पडताळणी कारवाई केली.
असता यामध्ये भूमि अभिलेख महिला कर्मचारी यांनी सुरुवातीला 15,000 रुपयाची लाच मागितली यानंतर तडजोडी आणती 14,000 रुपयांचे लाच मागितल्याचे निष्पन्न झाले
असून यामध्ये 20 ऑगस्ट रोजी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग पुणे यांच्या माध्यमातून सापळा रचून भूमिअभिलेखच्या
दोन कर्मचाऱ्यांना 10,000 रुपयाची लाच स्वीकारताना रंगेहात पकडून त्यांना ताब्यात घेतले
असून त्यांच्या विरुद्ध दौंड पोलीस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम 1988 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढीलचा अधिक तपास सुरू आहे
Pune ACB Trap : पुणे महापालिकेच्या वैद्यकीय महाविद्यालयातील बडाअधिकारी अॅन्टी करप्शनच्या जाळयात