कोरेगाव भीमा हिंसाचार प्रकरणी शरद पवार आज साक्ष नोंदवणार, सह्याद्री अतिथीगृहात दाखल

303 0

मुंबई- भीमा कोरेगाव हिंसाचार प्रकरणी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची आज साक्ष नोंदवली जाणार आहे. साक्ष नोंदवण्यासाठी शरद पवार सह्याद्री अतिथीगृहात दाखल झाले असून न्यायमूर्ती पटेल आयोगासमोर पवार साक्ष नोंदवणार आहेत. साक्ष नोंदवण्यासाठी त्यांना देण्यात आलेले तिसरे समन्स आहे.

यापूर्वी २३ आणि २४ फेब्रुवारी रोजी त्यांना साक्ष नोंवण्यासाठी आयोगासमोर हजर राहण्यासाठी जाणार होते. मात्र काही अपरिहार्य कारणास्तव ते उपस्थित होऊ शकले नाहीत.

काय आहे प्रकरण ?

1 जानेवारी 2018 रोजी पुण्यातील भीमा कोरेगाव येथे हिंसाचार झाला होता . त्यात एकाचा मृत्यू झाला होता तर दहा पोलिसांसह अनेक जण जखमी झाले होते . या घटनेचा निषेध म्हणून पुकारण्यात आलेल्या महाराष्ट्र बंददरम्यान पोलिसांनी एकूण 162 जणांवर गुन्हे दाखल केले होते. पुण्यात भरवण्यात आलेली एल्गार परिषद व त्यातील चिथावणीखोर भाषणांमुळे भीमा कोरेगावात हिंसाचार उसळल्याचा ठपका ठेवण्यात आला होता.

 

Share This News

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!