PRADHANMANTRI VIKASIT BHARAT ROJGAR YOJANAदेश आज 79 वा स्वातंत्र्यदिन मोठ्या उत्साहात साजरा करतो आहे
आणि या ऐतिहासिक दिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तरुणांना मोठी भेट दिली आहे.
लाल किल्ल्यावर 12व्यांदा तिरंगा फडकावून, नरेंद्र मोदी यांनी प्रधानमंत्री विकसित भारत रोजगार योजना(PRADHANMANTRI VIKASIT BHARAT ROJGAR YOJANA) सुरु करण्याची घोषणा केली आहे.
या योजनेमुळे देशातील कोट्यवधी तरुणांना रोजगार मिळणार आहे.लाल किल्ल्यावरून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाला संबोधित केलं.आणि तरुणांसाठी मोठी घोषणा केली.
एक लाख कोटी रुपयांच्या प्रधानमंत्री विकसित भारत रोजगार योजना आजपासून लागू होत असल्याचं त्यांनी सांगितलं.
या योजनेअंतर्गत खासगी क्षेत्रात पहिली नोकरी मिळवणाऱ्या तरुणांना 15 हजार रुपयांचं थेट आर्थिक सहाय्य सरकारकडून दिलं जाणार आहे.
तसेच, ज्या कंपन्या सर्वाधिक रोजगार देतील, त्यांनाही विशेष प्रोत्साहन बक्षीस मिळणार आहे.
PM NARENDRA MODI SPEECH LAL KILLA: पंतप्रधान नरेंद्र मोदींचं लाल किल्ल्यावरून भाषण
या योजनेमागचा सरकारचा उद्देश साडेतीन कोटी नवे रोजगार निर्माण करणे हा आहे.
पंतप्रधान मोदींनी सांगितलं की उद्योग ही देशाची मोठी ताकद आहे.
गेल्या काही वर्षांत लाखो स्टार्टअप्सनी अर्थव्यवस्थेला नवी गती दिली आहे.
INDEPENDENCE DAY SPECIAL:कसं होतं स्वतंत्र भारताचं पहिलं मंत्रिमंडळ
मुद्रा योजनेतून तरुणांनी स्वतःचे उद्योग उभे केले.आणि आता ही नवीन योजना त्याला अधिक बळ देणार आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 79 व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त देशातील तरुणांना मोठं गिफ्ट दिलं.
प्रधानमंत्री विकसित भारत रोजगार योजनेतून मिळणारी आर्थिक मदत भारताच्या उज्वल भविष्याचा पाया रचते का? हे पाहणं महत्वाचे असणार आहे..
DHANANJAY MUNDE SATPUDA: धनंजय मुंडेंचा मुंबईत फ्लॅट सोडवेना ‘सातपुड्या’चा थाट !