आभाळाला भिडल्या समुद्राच्या लाटा, कशा ते या व्हिडिओमध्ये पाहा

330 0

आता तुम्ही म्हणाल, समुद्राच्या लाटा आकाशाला कशाला टेकायला जातील ? अशक्य आहे ! पण एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर धुमाकूळ घालतोय. तो व्हिडिओ पहिला की या गोष्टीवर तुमचा नक्कीच विश्वास बसेल.

Buitengebieden ट्विटर हँडलवर हा व्हिडीओ शेअर केला आहे. यामध्ये एका विशाल समुद्रात उंच उंच लाटा उसळल्याचं दिसत आहे. व्हिडीओमध्ये स्लो मोशनमध्ये लाटा उसळताना दिसत आहे. यामध्ये लाटा वर आभाळाल्या टेकल्याचा भास होत आहे. खरोखरीच हा निसर्गाचा चमत्कार म्हणावा लागेल. ४० सेकंदाचा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आश्चर्यचकित करेल.

असे सांगितले जाते की, हे समुद्री एरोसोल आहे. जी एक नैसर्गिक घटना आहे, ती महासागरातील पाण्याच्या पृष्ठभागावरील बुडबुडे फुटल्यामुळं तयार होते. आतापर्यंत या व्हिडीओला तब्बल 1 मिलियनहून अधिक व्ह्यू मिळाले आहेत. तर 68 हजारांहून अधिक लाईक्स मिळाले आहेत.

https://twitter.com/buitengebieden/status/1521600107032027137

Share This News
error: Content is protected !!