YAVATMAL ZP SCHOOL NEWS:यवतमाळ जिल्ह्यातून एक अत्यंत धक्कादायक आणि गंभीर घटना समोर आली .
एका आठ वर्षांच्या चिमुकलीवर तिच्याच वर्गात शिकणाऱ्या शिकणाऱ्या मुलानी लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना घडली.
या घटनेने संपूर्ण राज्यात एकच खळबळ उडाली.
पाहुयात हे प्रकरण नेमकं काय आहे..
https://youtu.be/Ovbj_fRQ0iA
यवतमाळ जिल्ह्यातील बाभूळगाव मधील जिल्हा परिषद शाळेत तिसरीत शिकणाऱ्या आठ वर्षीय मुलीवर तिच्याच वर्गात शिकणाऱ्या एका अल्पवयीन मुलाने लैंगिक अत्याचार केले
आणि धक्कादायक बाब म्हणजे त्या मुलाला तिच्यात शिकणाऱ्या एका मुलीने मदत केली.
याप्रकरणी या दोनही आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतलं.
1 ऑगस्ट रोजी सर्व विद्यार्थी वर्गात बसले असताना आरोपी मुलांना प्लॅन आखून या योजनेत त्याने त्याच्या वर्गात शिकणाऱ्या मैत्रिणीची मदत मागितली. संबंधित मुलगी सुद्धा मदत करण्यासाठी तयार झाली. त्या दोघांनी मिळून 8 वर्षांच्या निष्पाप पीडितेला काहीतरी कारण सांगून शाळेच्या शौचालयात घेऊन गेले.
तिथे आरोपी मुलाने अल्पवयीन पीडितेवर लैंगिक अत्याचार केला.
ANANDRAO ADSUL: बेघर नागरिकांना हक्काची घरे उपलब्ध करुन देण्याच्या कार्यवाहीला गती द्या
तसेच, वर्गातील दुसऱ्या मुलीने या सगळ्या प्रकारात आरोपी मुलाला मदत केली. या सगळ्या प्रकारानंतर चिमुरडी प्रचंड घाबरली.. घटनेच्या काही दिवसानंतर या पिढीतील गुप्तांगात वेदना व्हायला लागल्या.. त्यानंतर ही गोष्ट तिने तिच्या आईला सांगितली.
त्यानंतर या पीडित मुलीची आई प्रचंड घाबरली.
तिने तात्काळ आपल्या मुलीला रुग्णालयात दाखल केलं.
डॉक्टरने तपासणी केल्यानंतर पीडित मुलीच्या गुप्तांगात डॉक्टरांना काही जखमा आढळल्या.
मुलीला डॉक्टरांनी विश्वासात घेऊन काही प्रश्न विचारल्यानंतर मुलींनी डॉक्टरांना सगळी आपबिती सांगितली.
तिच्याच वर्गात शिकणाऱ्या एका मुलांना आणि त्या मुलाला तिच्याच वर्गात शिकणाऱ्या मुलीने मदत करून शाळेतील शौचालयात अत्याचार केल्याचं सांगितलं..
यवतमाळमधील जिल्हा परिषद शाळेमधील तिसरीत शिकणाऱ्या मुलीवर तिच्याच
वर्गात शिकणाऱ्या मुलाने अत्याचार केल्याने एकच खळबळ उडाली आहे..
पीडित मुलीच्या आईच्या तक्रारीवरून पोलिसांनी पीडित मुलीचे जबाब घेऊन
लगेच कारवाई केली. या प्रकरणात यवतमाळच्या पोलीस अधीक्षकांनी स्वतः लक्ष घातला असून या प्रकरणातील आरोपींवर
पोक्सो कायद्या अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला विशेष म्हणजे दोन्ही आरोपी 9 वर्षाचा मुलगा
आणि एक 9 वर्षाची मुलगी या दोघांना ताब्यात घेऊन बाल सुधार गृहात पाठवण्यात आला आहे.
या अतिशय दुर्दैवी घटनेनंतर बालकांमध्ये अशा विकृत प्रवृत्ती कशा वाढत आहेत.
त्याचबरोबर या घटनेने लहान मुलांच्या सुरक्षिततेबद्दल पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण केलं आहे.
केवळ शाळांमध्येच नव्हे, तर समाजातही मुलांवर योग्य संस्कार करणं किती महत्त्वाचं आहे,
हे या घटनेतून सिद्ध होतं. अशा घटना रोखण्यासाठी समाज आणि शिक्षण व्यवस्थेला एकत्र येऊन काम करणं गरजेचं आहे..