PUNE BOPODI NEWS: पुण्याच्या बोपोडीमधून एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे.
विद्येच्या माहेरघरात चक्क शाळेच्या समोर गांजाची झाडं आढळून आली आहेत.
बोपोडीतील शाळेत रखवालदार म्हणून नियुक्ती केलेल्या
महिलेने शाळेच्या समोरच गांजाची झाड
लावल्याचा आरोप करण्यात आला आहे. PUNE BOPODI NEWS:
दरम्यान हा धक्कादायक प्रकार उघडकीस
आल्यानंतर ही झाडं कापून टाकण्यात आली आहेत.
:शाळेच्या रखवालदार महिलेने शाळेसमोरच गांजाची झाडं लावल्याचा आरोप
हा धक्कादायक प्रकार पुण्यातील बोपोडी परिसरात असलेल्या पुणे महानगरपालिकेच्या
डॉ. राजेंद्र प्रसाद शाळे समोर घडला आहे. हे शाळेत एका महिलेची रखवालदार म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
मात्र अनेकदा ही महिला कामावर हजर नसते अशा पद्धतीच्या इतर काही तक्रारी या आधीही आलेल्या आहेत.
मात्र आता या रखवालदार महिलेने चक्क शाळेच्या समोरच गांजाची झाडं लावल्याचं समोर आलं आहे.
ही महिला शाळेच्या समोरील बाजूस असलेल्या लहानशा गल्लीच्या कॉर्नरला राहते.
तिने याच घराच्या समोर गांजाची झाडं लावल्याचा आरोप काही पालकांकडून करण्यात आला.
त्यानंतर हे सगळं प्रकरण उघडकीस आलं.
मात्र काही वेळातच महिलेच्या कुटुंबीयांनी ही झाडं तोडून फेकून दिल्याची माहिती स्थानिकांकडून सांगितली जात आहे.
मात्र या महिलेवर कठोरातील कठोर कारवाई करून तिचं निलंबन करण्याची मागणी होत आहे.
दरम्यान या सगळ्या आरोपांची पोलिसांकडून चौकशी सुरू असून यात तथ्य आढळल्यास गुन्हा दाखल करण्यात येणार आहेत.
WHAT IS MANDAL COMMISSION: शरद पवारांच्या ‘मंडल यात्रे’मुळे चर्चेत आलेला मंडल आयोग नेमका काय?