KHED KUNDESHWAR NEWS: कुंडेश्वर महादेवाच्या दर्शनाला निघालेल्या भाविकांवर काळाचा घाला;9 जणांचा मृत्यू 25 जण जखमी

264 0

KHED KUNDESHWAR NEWS:पुण्यातून एक गंभीर बातमी समोर येत आहे.

श्रावणाच्या तिसऱ्या सोमवारी महादेवाच्या दर्शनासाठी निघालेल्या

भाविकांच्या गाडीचा मोठा अपघात होऊन जीवितहानी देखील झाली आहे.

हा अपघात पुण्यातील राजगुरुनगर परिसरात झाला असून

त्यामध्ये 9 महिलांचा मृत्यू तर 25 ते 30 भाविक गंभीर

जखमी असल्याची माहिती समोर येत आहे.

कुंडेश्वर महादेवाच्या दर्शनाला निघालेल्या गाडीचा भीषण अपघात
श्रावण महिन्यातील सोमवारी शिवमंदिरात जाण्यासाठी भाविकांची मोठी गर्दी पाहायला मिळते.

त्याच पद्धतीने अपघातग्रस्त पिकअप मधील भाविकही खेडमध्ये असलेल्या कुंडेश्वर मंदिरात KHED KUNDESHWAR NEWS: दर्शनासाठी निघाले होते.

मात्र पाईट जवळील घाटात आलेल्या नागमोडी वळणावर बॅलन्स बिघडल्यानं हा पिकप टेम्पो पलटी झाला.

SNEHA ZENDAGE BHARATI VIDYAPEETH POLICE: वैष्णवी हगवणे प्रकरणाची पुनरावृत्ती; 20 लाख रुपयांच्या हुंड्याची मागणी केल्यानं विवाहितेची आत्महत्या

ज्यामुळे खाली असलेला दरीत ही गाडी कोसळली. गाडीच्या खाली चेंगरल्याने तब्बल 9 महिला भाविकांचा मृत्यू झाला

असून इतर 25 ते 30 महिला जखमी आहेत. त्यांच्यावर वेगवेगळ्या रुग्णालयांमध्ये उपचार सुरू आहेत.

शोभा ज्ञानेश्वर पापड, सुमन काळूराम पापड, शारदा रामदास चोरगे, मंदा कानिफ दरेकर,

संजीवनी कैलास दरेकर, मिराबाई संभाजी चोरगे,

बायडाबाई ज्ञानेश्वर दरेकर, शकुंतला तानाजी चोरगे अशी मृत महिलांची नावं असून

या अपघाताचे हृदयद्रावक व्हिडिओ देखील समोर आले आहेत.

WORLD TRIBAL DAY 2025 : जागतिक आदिवासी दिनानिमित्त वरोरा येथे ऐतिहासिक रॅलीचे आयोजन

दरम्यान या सगळ्याची सरकारने दखल घेत तातडीने जखमींना उपचार उपलब्ध करून दिले आहेत.

Rakhi Day Leopard Attack Nashik : रक्षाबंधन दिवशीच बिबट्याने हिरावला भाऊ; बहिणीने थंड हाताला बांधली राखी

त्याचबरोबर मृतांच्या नातेवाईकांना प्रत्येकी चार लाखांचं अर्थसहाय्य केलं जाणार आहेत.

LATUR RAKSHABANDHAN SPECIAL: अपघातानंतर पत्नीनं साथ सोडली अन् बहिण भावाच्या मदतीला धावली

DAUND NANGAON BIBTYA NEWS: रानडुक्कराच्या शिकारीसाठी लावलेल्या फाशात अडकला बिबट्या

Share This News
error: Content is protected !!