SHRIMANT DAGDUSHETH GANPATI BELGIUM: गणपती बाप्पा मोरया... मंगलमूर्ती मोरया... च्या जयघोषासह श्रीमंत दगडूशेठ गणपती की जय... चे स्वर आता थेट बेल्जियममध्ये ( BELGIUM) देखील निनादणार आहेत.

SHRIMANT DAGDUSHETH GANPATI BELGIUM: बाप्पा मोरया रे…;श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती बाप्पाची बेल्जियममध्ये होणार प्रतिष्ठापना

1087 0

SHRIMANT DAGDUSHETH GANPATI BELGIUM: गणपती बाप्पा मोरया… मंगलमूर्ती मोरया… च्या जयघोषासह श्रीमंत दगडूशेठ गणपती की जय… चे

स्वर आता थेट बेल्जियममध्ये ( BELGIUM) देखील निनादणार आहेत.

अश्व श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीच्या दर्शनाला

महाराष्ट्र मंडळ बेल्जियम आणि शिरीष वाघमारे यांच्या पुढाकाराने बेल्जियममध्ये

दरवर्षी साज-या होणा-या गणेशोत्सवात यंदा प्रथमच

श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीच्या (SHRIMANT DAGDUSHETH GANPAT)  प्रतिकृतीची प्रतिष्ठापना करण्यात येणार आहे.

ही मूर्ती पुण्यातील मंदिरात विधीवत पूजन करुन नुकतीच

SHRIMANT DAGDUSHETH GANPATI BELGIUM:  महाराष्ट्र मंडळ बेल्जियमच्या सदस्यांकडे ट्रस्टतर्फे सुपूर्द करण्यात आली.

यावेळी उपक्रमाचे संयोजक शिरीष वाघमारे, तृप्ती वाघमारे,

ट्रस्टचे कोषाध्यक्ष महेश सूर्यवंशी, राजाभाऊ पायमोडे, रोहित लोंढे आदी उपस्थित होते.

श्रीं च्या मूर्तीची उंची अडीच फूट असून पुण्यामध्ये ही मूर्ती सुभाषनगरमधील

श्री नटराज आर्टचे भालचंद्र उर्फ लाला देशमुख व राजेंद्र देशमुख यांनी साकारली.

शिरीष वाघमारे, तृप्ती वाघमारे यांसह इतर सदस्यांनी ही मूर्ती स्विकारली.

SHRIMANT DAGDUSHETH GANPATI: ‘दगडूशेठ’ गणपतीच्या श्री पद्मनाभ स्वामी मंदिर सजावटीचे वासापूजन

तब्बल१७५ देशांमध्ये गणेशोत्सव साजरा होत असून यानिमित्ताने बेल्जियम मधील भारतीयांचा उत्साह देखील वाखाणण्यासारखा आहे.

शिरीष वाघमारे म्हणाले,

श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती बाप्पाचे बेल्जियम मध्ये आगमन हा महाराष्ट्र मंडळ बेल्जियमचा अभिमानाचा क्षण आहे.

Dagdusheth Ganapati : ‘दगडूशेठ’ गणपतीची श्री हनुमान रथातून थाटात मिरवणूक; RSS चे सरसंघचालक डॉ.मोहन भागवत यांच्या हस्ते श्रीं ची प्राणप्रतिष्ठापना

यामुळे परदेशात राहणाऱ्या भारतीय आणि महाराष्ट्रीय बांधवांसाठी गणेशोत्सवाचा आनंद घेता येणार असून यानिमित्ताने श्रद्धा आणि संस्कृतीचा सुवास थेट

महाराष्ट्रातून बेल्जियम मध्ये पोहोचणार आहे. बाप्पाची बेल्जियम मधील स्थापना ही आमच्यासाठी श्रद्धा, परंपरा आणि एकतेचे प्रतीक ठरणार आहे.

महेश सूर्यवंशी म्हणाले, आता विश्वात्मके देवे, हे संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींचे वाक्य आहे,

ते ख-या अर्थाने साध्य होत आहे. श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती हे

जगभरातील गणेशभक्तांचे श्रद्धास्थान आहे.

Dagdusheth Ganapati : पुण्यातील दगडूशेठ गणपतीच्या विसर्जनाच्या वेळेत मोठा बदल

बेल्जियम मधील गणेशभक्तांची अपार श्रद्धा श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीवर असल्याने

श्रीं ची मूर्ती त्यांना देण्यात आली आहे. जवळपास अडीच हजार मराठी बांधव त्याठिकाणी सक्रिय आहेत.

तसेच २० ते २५ हजार भारतीय नागरिक उत्सवात सहभागी होतात.

लोकमान्य टिळकांची समाज एकसंध होण्याची भावना, भारतासह परदेशात देखील घडत आहे,

याचा आनंद असल्याचे त्यांनी सांगितले.

 

Share This News
error: Content is protected !!