ROHIT PAWAR VS PADALKAR ON SHANRANU HANDE: आमदार गोपीचंद पडळकर यांच्या एका कार्यकर्त्याचं फिल्मी स्टाईलने अपहरण झाल्याची धक्कादायक घटना समोर आली होती. या घटनेमुळे सोलापुरात खळबळ उडाली आहे. शरणु हांडे असे अपहरण झालेल्या कार्यकर्त्याचे नाव आहे. अपहरणावरून आमदार रोहित पवार आणि आमदार गोपीचंद पडळकर यांच्यामध्ये आरोप प्रत्यारोप झालेत 

ROHIT PAWAR VS PADALKAR ON SHANRANU HANDE: पडळकर यांच्या कार्यकर्त्याच फिल्मी स्टाईल अपहरण; रोहित पवार गोपीचंद पडळकर आमने-सामने

209 0

ROHIT PAWAR VS PADALKAR ON SHANRANU HANDE: आमदार गोपीचंद पडळकर यांच्या एका कार्यकर्त्याचं फिल्मी स्टाईलने अपहरण झाल्याची धक्कादायक घटना समोर आली होती.

या घटनेमुळे सोलापुरात खळबळ उडाली आहे. शरणु हांडे असे अपहरण झालेल्या कार्यकर्त्याचे नाव आहे.

अपहरणावरून आमदार रोहित पवार आणि आमदार गोपीचंद पडळकर यांच्यामध्ये आरोप प्रत्यारोप झालेत

ROHIT PAWAR VS PADALKAR ON HANDE: शरणू हांडे अपहरण प्रकरणी रोहित पवार आणि गोपीचंद पडळकर आमने-सामने
2021 मध्ये गोपीचंद पडळकर यांची सोलापूर शहरात पत्रकार परिषद झाली होती.

पडळकर यांनी शरद पवारांवर सडकून टीका केली होती.

त्यावेळी राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या अमित सुरवसे याने 2021 साली गोपीचंद पडळकर यांच्या गाडीवर दगडफेक केली होती.

याचा बदला म्हणून मे 2025 या महिन्यात शरणु हांडे याने अमित सुरवसे याला मारहाण करत व्हिडीओ तयार केला होता.

JAGGU ANI JULIET MOVIE: पुनीत बालन स्टुडिओज निर्मित ‘जग्गू आणि ज्युलिएट’ला उत्कृष्ट चित्रपटाचा द्वितीय पुरस्कार

मारहाणीचा व्हिडीओ मोठ्या प्रमाणात वायरल झाल्यानंतर शरणु हांडे आणि अमित सुरवसे यांनी वाद मिटवून घेतला होता.

पण अमित याने याच मारहाणीचा आणि अपमानाचा बदला घेण्यासाठी आपल्या मित्राच्या मदतीने शरणु हांडे याचे अपहरण केले.

यासाठी त्याने सुरुवातीला पुण्यातून भाड्याने कार घेतली.

मित्रासह तो सोलापुरात आला आणि शरणु हांडे याला घराजवळून शास्त्राचा धाक दाखवून अपहरण केलं.

पोलिसांना या घटनेची माहिती मिळताच तात्काळ चार पथके तयार करण्यात आली.

तसेच कर्नाटकच्या दिशेने जाणाऱ्या मार्गांवर नाकाबंदी करण्यात आली.

BABRI RAJA BHAU MUNDE NCP: पंकजा मुंडेंना धक्का, धनंजय मुंडे “आऊट”; राष्ट्रवादीत बाबरी मुंडे “इन” झाल्यानं राजकीय गणितं बदलणार

रात्री 10 च्या सुमारास पोलिसांनी होर्टी गावाजवळ आरोपींना पकडलं.

यावेळी शरणु हांडे गाडीत गंभीर जखमी अवस्थेत सापडले.

पोलिसांनी त्यांना तात्काळ उपचारासाठी सोलापूरला आणले.

त्यामुळे त्यांचे प्राण वाचले. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात

हत्येच्या उद्देशाने अपहरण केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला.

यावेळी बोलताना शरणू हांडे म्हणाले“मी पानटपरी जवळ उभा होतो.

अचानक एक गाडी आली आणि त्यातून काही लोक उतरले.

त्यांनी थेट माझ्यावर हल्ला करायला सुरुवात केली. त्यांनी मला मारहाण केली.

BABRI RAJA BHAU MUNDE NCP: पंकजा मुंडेंना धक्का, धनंजय मुंडे “आऊट”; राष्ट्रवादीत बाबरी मुंडे “इन” झाल्यानं राजकीय गणितं बदलणार

यानंतर गाडीत कोंबले. त्यानंतर माझे पाय बांधले.

ते मला कुठेतरी घेऊन जात होते. ते एकूण सात लोक होते.

त्यांच्या हातात कोयते, हॉकी स्टिक आणि तलवार अशी धारदार हत्यारं होती.

गाडीतही मला सतत मारहाण करत होते.

त्यामुळे मला कुठे घेऊन जात आहेत हे मला कळलं नाही. असं शरणू हांडे म्हणालेत

शरणू हांडे यांना झालेल्या मारहाणीनंतर आमदार गोपीचंद पडळकर यांनी शासकीय रुग्णालयामध्ये शरणू हांडे यांची भेट घेतली.

शरणू हांडे यांचे अपहरण आणि मारहाण प्रकरणात रोहित पवार हेच मास्टरमाईंड असल्याचा दावा पडळकर यांनी केला आहे.

गोपीचंद पडळकर यांनी केलेला गंभीर आरोपानंतर रोहित पवार यांनी सुद्धा प्रतिक्रिया दिली..

शरणू हांडे प्रकरणाची सखोल चौकशी करावी अशी मागणी रोहित पवार यांनी केली

शरणू हांडे प्रकरणातील आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतल्या असून त्यांची सखोल चौकशी करण्यात येत आहे.

परंतु याच घटनेवरून आमदार गोपीचंद पडळकर आणि आमदार रोहित पवार यांच्यामध्ये आरोप प्रत्यारोप होत आहेत…

आता पोलीस चौकशीतून कोणती धक्कादायक माहिती पुढे येते ते पाहणं आता महत्त्वाचा असणार आहे..

 

Share This News
error: Content is protected !!