DAUND NANGAON BIBTYA NEWS: दौंड तालुक्यातील नानगाव परिसरात”रानडुक्कराच्या शिकारीसाठी लावलेल्या फाशात एक बिबट्या अडकला…
ही घटना पाहण्यासाठी शेकडो लोकांनी गर्दी केल्याने वाहतूक कोंडी झाली.
अखेर वनविभागाने आणि ‘रेसक्यू टीम’ने संयुक्त मोहिम राबवत बिबट्याची सुटका केली
DAUND NANGAON NEWS:रानडुक्कराच्या शिकारीसाठी लावलेल्या फाशात अडकला बिबट्या
दौंड तालुक्यातील नानगावजवळील आमोणीमाळ येथे गुरुवारी रात्री सोनबा ढमे यांच्या शेतात लावलेल्या लोखंडी फाशात एक मादी बिबट्या अडकला. (DAUND NANGAON BIBTYA NEWS)
ही फाशी रानडुक्कराची शिकार करण्यासाठी लावण्यात आली होती. शुक्रवारी सकाळी गावकरी शेतात गेले असता त्यांना बिबट्या अडकलेला दिसला.
गावकऱ्यांनी या घटनेची माहिती वनविभागाला दिली.या घटनेची माहिती मिळताच वनविभागाचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. पुण्यातील ‘रेसक्यू टीम’ला पाचारण करण्यात आले.
जवळपास एका तासाच्या प्रयत्नांनंतर बिबट्याला भूलीचे इंजेक्शन देऊन त्याच्या पायातील फासा काढण्यात आला.”सदर बिबट्याला सुरक्षितरित्या जेरबंद करण्यात आले आहे.
पुढील उपचारासाठी त्याला बावधन येथील वन्यप्राणी उपचार केंद्रात हलविण्यात आले आहे. बिबट्याला पाहण्यासाठी नानगाव व परिसरातील गावकऱ्यांनी मोठ्या प्रमाणावर गर्दी केली.
या गर्दीमुळे मुख्य रस्त्यावर वाहतूक ठप्प झाली होती. पोलिसांनी तातडीने घटनास्थळी दाखल होऊन परिस्थिती नियंत्रणात आणली.”
DIVE GHAT ROAD NEWS: दिवेघाटातील वाहतूक मार्गात बदल; नेमकं कारण काय?