BABRI RAJA BHAU MUNDE NCP: पंकजा मुंडेंना धक्का, धनंजय मुंडे “आऊट”; राष्ट्रवादीत बाबरी मुंडे “इन” झाल्यानं राजकीय गणितं बदलणार

285 0

BABRI RAJA BHAU MUNDE NCP: आधी गोपीनाथ मुंडे आणि नंतर पंकजा मुंडे यांची 35 वर्ष एकनिष्ठपणे साथ दिलेल्या कुटुंबाने अखेर मुंडेंची साथ सोडत नवा मार्ग निवडला.

कधीकाळी पंकजा मुंडे यांचे निकटवर्तीय समजले जाणारे राजाभाऊ मुंडे यांचे पुत्र बाबरी मुंडे BABRI RAJA BHAU MUNDE NCP: यांचा आज राष्ट्रवादीत पक्षप्रवेश झाला.

हा प्रवेश इतर प्रवेशांइतका साधा सोपा नाही. कारण यामागे अनेक धागेदोरे लपलेले आहेत.

धनंजय मुंडे यांना पर्याय म्हणून आणि पंकजा मुंडे यांची ताकद कमी करण्यासाठी हा पक्षप्रवेश केल्याचं बोललं जात आहे.

त्यामुळे बाबरी मुंडे नेमके कोण आणि त्यांच्या पक्षप्रवेशामागे प्लॅनिंग काय आहे, यावरचाच हा स्पेशल रिपोर्ट..

BABRI RAJA BHAU MUNDE NCP : भाजपला सोडून राष्ट्रवादीत प्रवेश केलेले राजाभाऊ आणि बाबरी मुंडे कोण ?

बीड मधील युवा नेते म्हणून बाबरी मुंडे हे प्रचलित चेहरा आहेत.

त्यांचे वडील राजाभाऊ मुंडे हे स्व. गोपीनाथराव मुंडे यांचे निष्ठावंत सहकारी होते.

गोपीनाथ मुंडेंच्या निधानानंतर ते भाजपमध्ये पंकजा मुंडेंशी एकनिष्ठ राहिले. या दोन्ही मुंडे कुटुंबांचे अगदी जिव्हाळ्याचे कौटुंबिक संबंध होते.

राजाभाऊ मुंडे हे बीड जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष राहिले आहेत. बँकेतील आर्थिक गैरव्यवहारांप्रकरणी त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल झाला होता.

या प्रकरणी ते २ वर्षे तुरूंगात होते. मात्र दुसरीकडे त्यांचे पुत्र बाबरी मुंडे हे अगदी तरुण वयापासून राजकारणात सक्रिय झाले.

ते वडवणी नगरपंचायतीचे माजी नगर अध्यक्ष राहिले आहेत. परंतु मागच्या दोन-तीन वर्षांमध्ये बीड मधील स्थानिक राजकारणाची समीकरणं बदलली

आणि मुंडे पिता-पुत्र पंकजा मुंडेंपासून दुरावले.

2024 मध्ये झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीत बीडच्या माजलगाव मतदारसंघातून बाबरी मुंडे अपक्ष उभे होते.

विद्यमान आमदार प्रकाश सोळंके यांच्याविरोधात निवडणूक लढवण्याची हिंमत त्यांनी दाखवली.

मात्र अपेक्षा होती ती पंकजा मुंडे यांच्या मदतीची.. अर्थातच पंकजा मुंडे यांची या निवडणुकीत

त्यांना कसलीच मदत झाली नाही. तरी देखील त्यांनी 18000 मतं मिळवली.

PMC COMMISSIONER & CORPORATOR CONTROVERSY:मनपा आयुक्त आणि नगरसेवक वादाची परंपरा जुनीच; याआधी कोणत्या नगरसेवक आणि पालिका आयुक्तांमध्ये झाले होते वाद?

प्रकाश सोळंके हे पुन्हा एकदा आमदार पदी निवडून आले.

आणि ज्या सोळंकेंविरोधात बाबरी मुंडे यांनी निवडणूक लढवली

त्यांच्याच नेतृत्वात त्यांच्याच पक्षात प्रवेश करण्याचा निर्णय घेतला..

NCSL Boston 2025 : अमेरिकेतील बोस्टन येथील नॅशनल कॉन्फरन्स ऑफ स्टेट लिजिस्लेटर्स २०२५ मध्ये भारतातील २४ राज्यातून १३० आमदारांचा सहभाग
बीड आणि मुंडे आडनावाचं एक नवं समीकरण बीडकरांना अनुभवायला मिळणार आहे.

राजाभाऊ मुंडे आणि बाबरी मुंडे यांच्या पक्षप्रवेशामुळे बीडच्या राजकारणात उलथापालथ होणार आहे.

ऐन स्वराज्य संस्थांच्या तोंडावर हा पक्षप्रवेश झाल्यामुळे नेमका काय फरक पडू शकतो हे जाणून घेणे देखील महत्त्वाचं आहे.

मुंडे पिता- पुत्रांचं सामाजिक राजकीय वजन

गोपीनाथ मुंडे आणि पंकजा मुंडे यांच्याबरोबर काम करत असताना राजाभाऊ मुंडे आणि बाबरी मुंडे यांचा जनसंपर्क दांडगा झालेला आहे.

त्यांचं बीडच्या माजलगाव, धारूर, तेलगाव आणि वडवणी या भागांमध्ये मोठं राजकीय वजन आहे. मराठा- ओबीसी संघर्षात आश्वासक ओबीसी चेहरा म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं.

येत्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या दृष्टिकोनातून त्यांनी अजित पवारांची साथ धरल्याने निवडणुकांमध्ये मोठा परिणाम पाहायला मिळू शकतो.‌

दुसरीकडे स्वतःच्याच प्रतिस्पर्ध्याला स्वतःच्याच नेतृत्वाखाली स्वतःच्याच पक्षात स्थान द्यायच्या सोळंकेंच्या निर्णयाची दाद द्यावी लागेल.

‘मात्र यामागे मोठी राजकीय गणितं असणार आहेत. गेल्या काही वर्षांमध्ये घडलेल्या अनेक घटनांमुळे धनंजय मुंडे वारंवार

“नको त्या” गोष्टीमुळे चर्चेत येतात. याचा फटका राष्ट्रवादीसह मित्र पक्षांनाही बसतोय. दुसरीकडे राज्यातही धनंजय मुंडे यांच्या विरोधातलं वातावरण तयार झाल्याचं दिसतंय.

त्यामुळे आगामी निवडणुका डोळ्यासमोर ठेवून धनंजय मुंडे यांना पर्याय म्हणून आणखी एक ओबीसी चेहरा लॉंच करण्यासाठी बाबरी मुंडे यांना संधी दिली जात असावी.

दरम्यान बाबरी मुंडे यांच्या प्रवेशाच्या एकाही बॅनरवर धनंजय मुंडेंचा फोटो नव्हता तसंच त्यांना कार्यक्रमाचं आमंत्रण देखील नव्हतं.

त्यामुळे हे सगळं धनंजय मुंडे यांना बाजूला सारून बाबरी मुंडे यांना पुढे आणण्याचे संकेत असल्याचं बोललं जात आहे.

पक्षप्रवेशाबाबत बोलताना राजाभाऊ मुंडे म्हणाले की, ‘बीड जिल्ह्याचा विकास खुंटतोय.

अजित पवार योग्य पद्धतीने लक्ष घालत आहेत

त्यामुळे आमदार प्रकाश सोळंके यांच्या नेतृत्वात भाजपची साथ सोडून राष्ट्रवादी बरोबर जाण्याचा निर्णय घेतला.

या निर्णयानंतर पंकजा मुंडे यांनी साधा फोनही केला नाही.

त्यामुळे त्यांच्याबद्दल आम्हाला काहीच बोलायचं नाही. तर बाबरी मुंडे म्हणाले, संघर्षाच्या काळात पक्षासाठी एकनिष्ठतेने काम केलं.

पण पक्ष, नेते आणि स्थानिक कार्यकर्त्यांकडूनच आमच्याकडे दुर्लक्ष झालं.

जिथे न्याय मिळत नसेल अशा पक्षात राहण्यात काहीच अर्थ नाही.

त्यामुळेच आता अजित दादा देतील ती जबाबदारी सक्षमपणे पार पाडेन, असं बाबरी मुंडे म्हणाले.

त्यामुळे या पक्षप्रवेशानंतर बीडची राजकीय समीकरणं कशी बदलतात आणि

त्याचा परिणाम स्वराज्य संस्थांचा निवडणुकांवर कशा पद्धतीने दिसतो हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे.

त्याचबरोबर धनंजय मुंडेंना आतापर्यंत भरभरून पद देणारे अजित पवार बाबरी मुंडेंना कोणते पद देणार ?

याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे.

Share This News
error: Content is protected !!