PMC COMMISSIONER & CORPORATOR CONTROVERSY: महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते आणि पुण्याचे माजी नगरसेवक ॲड. किशोर शिंदे आणि पुण्याचे महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांच्यात मोठा वाद झाला

PMC COMMISSIONER & CORPORATOR CONTROVERSY:मनपा आयुक्त आणि नगरसेवक वादाची परंपरा जुनीच; याआधी कोणत्या नगरसेवक आणि पालिका आयुक्तांमध्ये झाले होते वाद?

225 0

PMC COMMISSIONER & CORPORATOR CONTROVERSY: महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते आणि

पुण्याचे माजी नगरसेवक ॲड. किशोर शिंदे आणि पुण्याचे महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांच्यात मोठा वाद झाला

आणि पुणे महानगरपालिका आवारात बुधवारी रात्री मोठा गदारोळ झाला.

मात्र पुणे महानगरपालिका आयुक्त आणि नगरसेवक वादाची (PMC COMMISSIONER & CORPORATOR CONTROVERSY) ही काही पहिली वेळ नव्हती

इतिहासाचा धांडोळा घेतला तर ही जुनी परंपरा असल्याचं समजलं.

या आधी कोणते पालिका आयुक्त आणि नगरसेवक यांच्यात वाद झाले पाहूयात या स्पेशल रिपोर्टमधून

PMC COMMISSIONER & CORPORATOR CONTROVERSY: पुणे मनपा आयुक्त आणि नगरसेवक वादाची परंपरा जुनीच

महापालिकेत गोंधळ निर्माण झाला. त्याने जुन्या घटनांना उजाळा मिळाला असून, महापालिकेत अधिकारी आणि राजकीय नेत्यांच्या वादांची परंपरा जुनीच असल्याचे समोर आले आहे.

पुणे महापालिकेत (PMC COMMISSIONER & CORPORATOR CONTROVERSY) 1997 साली तत्कालीन आयुक्त रमानाथ झा आणि तत्कालीन स्थायी समितीचे अध्यक्ष आबा बागुल यांच्यामध्ये जोरदार वादावादी झाली होती.

त्यावेळी रमानाथ झा यांनी स्थायी समितीच्या बैठकांवर बहिष्कार टाकला होता.

सप्टेंबर 2006 मध्ये मनसेचे माजी आमदार दीपक पायगुडे यांच्या नेतृत्वाखाली मनसेच्या कार्यकर्त्यांनी तत्कालीन आयुक्त नितीन करीर यांच्या दालनात घुसून सर्व दरवाजे आतून बंद केले आणि तब्बल दोन तास त्यांना घेराव घातला होता. शहरातील रस्त्यांच्या दुरुस्तीसाठी दीर्घकालीन आराखडा तयार करण्याची लेखी हमी त्यांनी घेतल्यावरच आंदोलन मागे घेण्यात आले होते. या घटनेनंतर मनसेच्या 10 कार्यकर्त्यांना पोलिसांनी अटक केली होती.

PMC FOUR MEMBER WARD STRUCTURE: 42 प्रभाग 165 नगरसेवक;चार सदस्यीय प्रभाग रचना कुणाच्या फायद्याची?

फेब्रुवारी 2014 मध्ये भाजपच्या नगरसेवकांनी कचऱ्याच्या प्रश्नावरून महापालिकेत जोरदार आंदोलन केले. तत्कालीन आयुक्त विकास देशमुख यांच्या टेबलावरच कचरा ओतत त्यांनी निषेध व्यक्त केला होता. तत्कालीन भाजप शहराध्यक्ष अनिल शिरोळे आणि
अन्य नगरसेवकांनी कचऱ्याचे पोते, बादल्या घेऊन महापालिकेच्या पायऱ्यांवर आंदोलन करत सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेसवर निशाणा साधला होता.

फेब्रुवारी 2019 मध्ये माजी नगरसेवक रवींद्र धंगेकर यांनी तत्कालीन अतिरिक्त आयुक्त राजेंद्र निंबाळकर यांच्याशी वाद घालत त्यांना धक्काबुक्की केल्याचा प्रकार घडला. पाषाण व कात्रज तलावांतील जलपर्णी प्रकरणावरून काँग्रेस व राष्ट्रवादीच्या नगरसेवकांनी महापौर दालनात आंदोलन करताना हा प्रकार घडला. त्यानंतर धंगेकर यांच्यासह इतरांवर गुन्हा दाखल करण्यात आला होता.

Pune PMC Water Supply | पुण्यात 18 मे पासून पाणी कपात, ‘या’ दिवशी बंद राहणार शहराचा पाणी पुरवठा

Share This News
error: Content is protected !!