महापालिकेकडून १० जलतरण तलावाला टाळे, पुणेकरांची ऐन उन्हाळ्यात गैरसोय

550 0

पुणे- कंत्राटदारांनी चुकीच्या पद्धतीने चालवण्यात आल्यामुळे पुण्यातील काही जलतरण तलाव महापालिकेकडून सील करण्यात आले आहेत. त्यामुळे ऐन उन्हाळ्यात नागरिकांना गैरसोयीचा सामना करावा लागत आहे.

या कंत्राटदारांनी करारातीत जबाबदाऱ्या पूर्ण केल्या नाहीत आणि करारामध्ये नमूद केलेले महापालिकेद्वारे आकारलेले शुल्क भरले नाही, असा ठपका ठेवण्यात आला आहे. प्राप्त झालेल्या माहितीनुसार महापालिका परिसरात 34 जलतरण तलाव आहेत आणि त्यापैकी 16 बंद आहेत. उर्वरित १८ पैकी शिवाजीनगर, वडगाव, येरवडा, धनकवडी, सिंहगड रोड आणि महात्मा गांधी रोड या ठिकाणी आहेत. त्यापैकी ५ जणांनी महापालिकेचे शुल्क भरले असून त्यांच्या सुविधा सुरु झाल्या असल्याची माहिती पुणे महापालिकेचे क्रीडा अधिकारी संतोष वारुले यांनी दिली. उर्वरित कंत्राटदारांना शुल्क भरण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

दरम्यान, कंत्राटदारांनी असा दावा केला की, कोविड च्या काळामध्ये जलतरण तलाव बंद ठेवले गेल्यामुळे उत्पन्न मिळाले नाही. त्यामुळे शुल्क भरणे शक्य झाले नाही. मात्र महापालिका आणि कंत्राटदारांच्या वादामध्ये पुणेकरांना ऐन उन्हाळ्यात जलतरण तलावाचा आनंद घेता येत नाही. त्यामुळे त्यांना गैरसोयीचा सामना करावा लागत आहे.

Share This News
error: Content is protected !!