JALNA KALYANI VAYAL CASE: ‘दीदी, तो म्हणतोय लग्न नाही केलंस तर तुझी बदनामी करेल, आई-बाबांना कळलं तर त्यांना खूप त्रास होईल’, हे शब्द आहेत (JALNA KALYANI VAYAL CASE) जालन्याच्या कल्याणीचे.. मित्राच्या त्रासाला कंटाळलेल्या कल्याणीने ३० जुलैला आत्महत्या केली. तिच्या आत्महत्येच्या चार दिवसानंतर आता आत्महत्ये मागचं धक्कादायक कारण समोर आलंय..
RAJ THACKERAY ON BMC ELECTION : मनसे 100% महापालिका निवडणुकीत सत्तेवर येणार ; राज ठाकरेंचा एल्गार..!
बी फार्मसी च्या तिसऱ्या वर्षात शिकणारी कल्याणी वायाळ, या तरुणीनं रूममध्येच गळफास घेऊन आत्महत्या केली. तिच्या मैत्रिणींनं कल्याणीची बहीण असलेल्या प्रतीक्षाला फोन करून कल्याणीची प्रकृती बिघडली असून तातडीने येण्याचा निरोप दिला. मात्र नेमकं काय घडलंय हे जाणून घेण्यासाठी प्रतीक्षानं कल्याणच्या फोनवर फोन केला.. हा फोन उचलला तो थेट पोलिसांनी.. कल्याणीनं गळफास घेतल्याचं पोलिसांनी बहीण प्रतीक्षा अभिषेक काकडे हिला सांगितलं. आणि संपूर्ण वायाळ कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला. त्याचबरोबर या आत्महत्ये मागे असलेलं कारणही समोर आलं. पंधरा दिवसांपूर्वी कल्याणी ही सावरगाव, ता. मंठा येथे आली होती. ती प्रचंड टेन्शनमध्ये असल्यासारखी वाटत होती. त्यावर बहीण प्रतीक्षाने तिला विचारणा केली. मात्र कल्याणी काहीच सांगत नव्हती. अखेर वारंवार विचारल्यानंतर तिने सुरज मोरे हे नाव घेतलं.. सुरज मोरे या तरुणाशी संभाजीनगर मध्ये चार ते पाच वर्षांपूर्वी ओळख झाली होती. कल्याणी आणि सुरज मित्र होते. मात्र सुरज काही दिवसांपासून कल्याणीवर लग्न करण्यासाठी दबाव टाकत होता. लग्न केलं नाहीस तर तुझी बदनामी करेल, तुझे आणि माझे फोटो तुझ्या घरच्यांना पाठवेन, अशा धमक्या तो देत होता. ‘दीदी, आई-बाबांना हे सगळं कळलं तर त्यांना खूप त्रास होईल गं’ असं म्हणत कल्याणीनं तिची व्यथा बहिणीपुढे मांडली. त्यामुळे प्रतीक्षा आणि तिचा पती अभिषेक काकडे यांनी सुरज मोरेला गाठून त्याची समजूत घातली. कल्याणीला त्रास देऊ नको असंही सांगितलं मात्र त्यावेळी सुरजनं प्रतीक्षाचा पती अभिषेक यालाच अरेरावी केली. याच सगळ्यामुळे त्रास होऊन गेलेल्या कल्याणीने रूमवर गळफास घेतला.
दरम्यान या प्रकरणात आता सुरज मोरेच्या विरोधात सिडको पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांकडून तपासही सुरू आहे मात्र सुरज मोरे हा केवळ एक आरोपी नसूनही प्रवृत्ती होत आहे. “नो मीन्स नो” हे तरुणांना अजूनही कळत नाहीये. त्यामुळेच अशा पद्धतीने ब्लॅकमेलिंग आणि मानसिक छळाला कंटाळून होणाऱ्या मुलींच्या आत्महत्या वाढत आहेत. याकडे समाज म्हणून सगळ्यांनीच गांभीर्याने पाहणं ही गरजेचं झालंय.