RAJ THACKERAY ON BMC ELECTION : मनसे 100% महापालिका निवडणुकीत सत्तेवर येणार ; राज ठाकरेंचा एल्गार..!

309 0

RAJ THACKERAY ON BMC ELECTION : “यंदा मनसे 100% महापालिका निवडणुकीत सत्तेवर येणार” असं राज ठाकरे यांनी मुंबईतल्या मनसेच्या मेळाव्यामध्ये बोलताना (RAJ THACKERAY ON BMC ELECTION) म्हटलंय. आगामी महापालिका निवडणुकांत महत्वपूर्ण ठाणार “ठाकरे फॅक्टर… ” मनसेच्या मेळाव्यात नक्की काय म्हणाले राज ठाकरे पाहूयात…

आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे रणशिंग फुंकले आहे. त्यातही आर्थिक राजधानी असलेल्या मुंबई महापालिकेवर कोणाची सत्ता येणार याकडे अवघ्या देशाचे लक्ष लागलय. मुंबई महापालिका काबीज करण्याचं प्रत्येक पक्षाचंच स्वप्न आहे. त्याकरिता राजकीय रणधुमाळी सुद्धा सुरू झाल्याचा पाहायला मिळतेय अशातच मुंबई महापालिकेसाठी मनसेने सुद्धा चंग बांधलाय. सध्या राज्याच्या राजकारणात भाजप एक शक्तिशाली पक्ष म्हणून उभा आहे. मुंबई महापालिकेवर महायुतीची सत्ता आणण्यासाठी मुख्य प्रतिस्पर्धी आहे. यापूर्वी शिवसेना मुंबई महापालिकेच्या सत्तेवर बऱ्याचदा बसली आहे. ठाकरेंच वर्चस्व मुंबई महापालिकेवर पाहायला मिळालेला आहे. मात्र आता सत्तेची समीकरण बदलली आहेत. अशातच उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्या युतीची सुद्धा चर्चा आहे. आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर एकूणच पदाधिकाऱ्यांच्या मेळाव्यात बोलताना राज ठाकरे यांनी रंगशारदा येथे कार्यकर्त्यांना कानमंत्र दिलाय…
आज वीस वर्षांनी दोन भाऊ आम्ही एकत्र येऊ शकतो तर तुम्ही तुमच्या मध्ये हेवेदावे कशासाठी ठेवता? वाद कशासाठी घालता अशी विचारणा करत एकसंधपणे काम करण्याचं आवाहन त्यांनी केलं. यावेळी बोलताना राज ठाकरे यांनी महापालिका जिंकण्याचा निर्धार व्यक्त केला ते म्हणाले मुंबईमध्ये आपला पक्ष सर्वाधिक बलवान असून महापालिकेमध्ये सत्ता आपलीच येणार

TOP NEWS MARATHI LIVE : ‘वाल्मीक’पुत्र सुशील मैदानात !’मुंडेंच्या हत्येदिवशी माझे वडील तर मुंडेंच्या सासऱ्यांसोबत तिरूपतीला !’कराड कुटुंब घेणार पत्रकार परिषद

राज ठाकरे यांनी अनेकदा मराठीचा मुद्दा उचलून धरला सध्या मराठी भाषेवरून राजकारण चांगलंच तापलेलं पहायला मिळतंय.राज ठाकरेंनी मेळाव्यात पदाधिकाऱ्यांना “मराठी भाषेचा मुद्दा घराघरात पोहोचवा पण हिंदी भाषकांचा द्वेष करू नका असा महत्त्वपूर्ण सल्ला दिलाय” मराठी भाषेसाठी मनसेने घेतलेली भूमिका प्रत्येक मराठी बांधवांपर्यंत पोहोचवणं आपलं कर्तव्य आहे पण हे काम करताना कोणाचाही द्वेष करण्याची गरज नाही. हिंदी भाषकांचा द्वेष न करता आपल्या मराठी अस्मितेचा मुद्दा सकारात्मक पद्धतीने लोकांसमोर मांडा अशा सूचना राज ठाकरे यांनी दिल्यात.

PUNE NEWS : पुण्यात सैराट प्रकरणाची पुनरावृत्ती ; पतीला बेदम मारहाण तर, पत्नीचं केलं अपहरण

सध्याच्या राजकारणात राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांची युती होणार का? याबाबत अजूनही अस्पष्टता आहे याबाबतही राज ठाकरे यांनी मेळाव्यात बोलताना सांगितलं ” ठाकरेंच्या शिवसेनेसोबत काय करायचं ते माझ्यावर सोडा मी युतीबाबत योग्य वेळी बोलेन, माझ्या आदेशाची वाट पाहा, असं राज ठाकरे यांनी सांगितलं. याबरोबरच यंदा मनसे 100% महापालिका निवडणुकीत सत्तेवर येणार असा निर्धार राज ठाकरे यांनी बोलून दाखवला.

ठाकरे बंधूंची युती, मराठी हिंदी भाषा आणि राजकारण, हे आगामी स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकांत महत्वपूर्ण ठरू शकते यात शंका नाही. एकीकडे शंभर टक्के महापालिका निवडणुकीत सत्तेवर येणार असा निर्धार राज ठाकरे यांनी बोलून दाखवलाय मात्र इतर पक्षही काही गप्प बसणार नाहीत. मुंबई महापालिकेवर सत्ता नेमकी कोणाची येणार हे येणारा काळचं ठरवेल.

Share This News
error: Content is protected !!