PUNE NEWS : पुण्यात सैराट प्रकरणाची पुनरावृत्ती ; पतीला बेदम मारहाण तर, पत्नीचं केलं अपहरण

335 0

PUNE NEWS : पुण्यातील खेड तालुक्यात ‘सैराट’ स्टाईल प्रकार घडला. आंतरजातीय प्रेमविवाह केल्यामुळे एक विवाहित जोडप्याला भरचौकात मारहाण करण्यात आली.. यापैकी विवाहित तरुणाला बेदम मारहाण करण्यात आली असून तरुणीचं अपहरण करण्यात आलंय..धक्कादायक बाब म्हणजे या प्रकरणात स्वतः मुलीची आई आणि भाऊ सहभागी असल्याचं समोर आलंय… या मारहाणीचा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतोय.. पाहुयात या वरचा स्पेशल रिपोर्ट

Beed News : गोट्या गित्तेने मुंबईत रेकी करून जितेंद्र आव्हाड यांच्यावर हल्ल्याचा रचला कट? – विजयसिंह बांगरांचा आरोप

पुण्याच्या खेड तालुक्यात खरपुडी गावात, आंतरजातीय विवाह केल्यामुळे एका नवरा-बायकोला भरचौकात जबर मारहाण करण्यात आली.विश्वनाथ गोसावी आणि त्याची बायको प्राजक्ता गोसावी असे मारहाण करण्यात आलेल्या नवरा-बायकोची नावं आहेत. काही दिवसांपूर्वी प्राजक्ताने कुटुंबीयांच्या विरोधात जाऊन विश्वनाथ गोसावीसोबत पळून जाऊन लग्न केले होते. त्यामुळे प्राजक्ताचे कुटुंबीय प्रचंड चिडले होते. मुलीने पळून जाऊन आंतरजातीय विवाह केल्यामुळे समाजात आपली बदनामी झाल्याचा राग त्यांच्या मनात होता. यातूनच त्यांनी प्राजक्ता आणि विश्वनाथ यांना आधी मारहाण केली. त्यानंतर त्यांनी प्राजक्ताचे अपहरण केले.प्राजक्ताच्या कुटुंबीयांना हा विवाह मान्य नव्हता. समाजात बदनामी झाल्याचा राग मनात धरून, तिच्या कुटुंबीयांनीच भररस्त्यात तिचं अपहरण केलं. आणि त्यानंतर भर चौकात त्यांना बेदम मारहाण केली.. या घटनेचा थरारक व्हिडीओ स्थानिकांनी मोबाईलमध्ये रेकॉर्ड केला सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.या घटनेनंतर प्राजक्ताच्या आई, भावासह 15 जणांविरोधात खेड पोलीस ठाण्यात जबर मारहाण आणि अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सध्या आरोपींचा शोध सुरू असून पोलीस तपास वेगानं सुरू आहे.

TOP NEWS MARATHI :PUNE GANESHOTSAV MANDAL | पुण्यातील गणेशोत्सव मंडळाच्या कार्यकर्त्यांच्या बैठकीत खडाजंगी

भारतीय संविधानाने सर्वांना स्वातंत्र्याचा अधिकार दिला असतानाही भारतात अजूनही आंतरजातीय प्रेम विवाह करणे हे समाजातून गुन्हा मानलं जातं आहे… जात, समाज आणि प्रतिष्ठेच्या नावाखाली मुलींना जबरदस्तीने मारलं जातंय… आणि प्रेम करणाऱ्यां जोडप्यांना शिक्षा दिली जातं आहे, ती समाजाच्या ‘न्यायव्यवस्थे’तून नव्हे, तर त्यांच्या रक्ताच्या नात्यांकडून!खरपुडीमधली ही घटना केवळ प्राजक्ताला किंवा तिचा पती विश्वनाथ यांना झालेली ती मानसिक किंवा शारीरिक जखम नाही, तर समाजाच्या मनोवृत्तीवर झालेली एक खोल जखम आहे. आंतरजातीय प्रेमविवाह करणाऱ्या जोडप्यांना विरोध करणारी संस्कृती समाजातून कधी हद्दपार होणार? असा प्रश्नही या निमित्ताने उपस्थित होत आहे.. एकविसाव्या शतकातही आपण समाजामध्ये प्रबोधन करण्यात कमी पडत आहोत का असा प्रश्न उपस्थित होत आहे.. या प्रकरणी 15 जणांवरती गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस त्यांना ताब्यात घेऊन त्यांच्यावर काय कारवाई करतात हे पाहणं आता महत्त्वाचं असणार आहे

Share This News
error: Content is protected !!