Sanjay Raut on Devendra Fadnavis : आमच्यावर गोळ्या घालणार का? संजय राऊतांची भाषेच्या मुद्द्यावरून मुख्यमंत्र्यांवर टिका

100 0

Sanjay Raut on Devendra Fadnavis : रायगड सभेमध्ये शेकापच्या मेळाव्यात बोलताना राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर हिंदी भाषा वरून चांगलीच टीका केली. शेकाप काल उद्धव (Sanjay Raut on Devendra Fadnavis) बाळासाहेब ठाकरे गटामध्ये सामील झाला. यावेळी राज ठाकरे, उद्धव ठाकरे आणि संजय राऊत हे एकाच मंचावर उपस्थित असल्याचे पाहायला मिळालं त्यानंतर आज पुन्हा एकदा हिंदी भाषेच्या मुद्द्यावरून शिवसेनेचे संजय राऊत यांनी मुख्यमंत्र्यांना टार्गेट केलंय.

Cotton Wilt Disease in Hingoli : हिंगोली जिल्ह्यात कपाशीवरील रोगाच्या प्रादुर्भावाने वाढली चिंता

मराठी आलीच पाहिजे म्हणत मातृभाषेच्या नावानं हिंसा होत असेल तर त्यावर कारवाई करणार असा इशारा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मनसे प्रमुख राज ठाकरे आणि शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांना दिलाय. यावरूनच शिवसेना ठाकरे कटाचे खासदार संजय राऊत यांनी हल्लाबोल केला त्यांनी म्हटलं की “मराठी भाषा संदर्भात आम्ही हिंसाचार करणार काय उखडायचा आहे ते उखडून घ्या. देवेंद्र फडणवीस हा महाराष्ट्र आहे. हे राज्य मराठी माणसाचं आहे. 106 हुतात्म्यांनी इथे बलिदान दिले तुम्ही दिलेलं नाही. तुम्ही राज्याचे तुकडे करणारे लोक आहात आज तुम्ही राज्याचे मुख्यमंत्री आहात जरा म्हणून जरा गप्प आहात ” अशा आक्रमक शब्दात संशय राऊत यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे.

*TOP NEWS MARATHI : हिंगोलीतील कळमनुरीमध्ये श्रावणमासानिमित्त कावड यात्रा; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे राहणार उपस्थित

म्हणून आमच्यावर गोळ्या घालणार आहात का?

पुढे बोलताना त्यांनी सांगितले की तुमचे मुख्यमंत्री पद ज्या दिवशी जाईल तेव्हा तुम्ही वेगळा विदर्भ मागाल हे आम्हाला माहित आहे. मराठी भाषेसाठी प्रसंगी आक्रमक होण्याची वेळ आली तर आम्ही होणारच तुम्ही काय मोरार्जी देसाई व्हायला जात आहात का ? असा सवाल सुद्धा संजय राऊत यांनी केलाय. मराठीचा आग्रह धरतोय म्हणून आमच्यावर गोळ्या घालणार आहात का? हो धरतोय आणि धरत राहणार.. असं ते म्हणाले. आम्ही गुजरातला जाऊन मराठीचा आग्रह धरत नाही तुमच्या गुजरात मध्ये आधी हिंदीसक्ती करा आणि मग महाराष्ट्रावर लादा असा पलटवार त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर केलाय.

दरम्यान कैलास गोरंट्याल यांच्या भाजपा प्रवेशावर प्रश्न विचारला असता संजय राऊत म्हणाले की ’50 खोके एकदम ओके’ या घोषणाचे जनक कैलास गोरंट्याल आहेत. विधानभवनाच्या आवारात विधानसभा शिवसेना काँग्रेसच्या कैलास गोरंट्याल यांनी पन्नास खोके एकदम ओके ही घोषणा दिली आणि ती संपूर्ण देशात पसरली. आता 50 खोके एकदम ओके वाले कैलास गोरंट्याल हे देवेंद्र फडणवीस यांच्या पक्षात आहेत.

एकूणच राज ठाकरे यांच्या भाषणानंतर राज्यामध्ये पुन्हा एकदा राजकीय वातावरण पेटल्याचं दिसून येत आहे. एकीकडे देवेंद्र फडणवीस हे त्रिभाषा सूत्रावर ठाम असल्याचं पाहायला मिळते आहे तर दुसरीकडून हिंदी भाषा सक्ती साठी विरोध मात्र जोरदार होताना दिसतो आहे.

Share This News
error: Content is protected !!