AMRAVATI POLICE NEWS : गळ्यावर व्रण, महिला पोलिसाच्या बाबतीत काय घडलं?

80 0

अमरावती शहरातून एक धक्कादायक घटना समोर आलीये. घरात घुसून महिला पोलिस कर्मचाऱ्याची हत्या करण्यात आलीये. हे प्रकरण नेमकं काय आहे? पाहूयात

अमरावती जिल्ह्यातील फ्रेझरपुरा पोलीस स्टेशन हद्दीतील गुरुकृपा कॉलनी मध्ये शुक्रवारी महिला पोलीस अंमलदार आशा धुळे -तायडे या 38 वर्षीय महिलेची हत्या झाल्याचे समोर आले. आशा या मागच्या 9 वर्षे शिपाई या पदावर कार्यरत होत्या. मागच्या 13 तारखेपासून त्या रजेवर होत्या. त्यांना 14 वर्षाचा एक मुलगा आणि 7 वर्षाची एक मुलगी सुद्धा आहे.

शुक्रवारी संध्याकाळच्या 6:00 वाजण्याच्या सुमारास त्या घरात एकटाच होत्या पती मुलगी आणि मुलगा बाहेर होते. मुलगा संध्याकाळी सहा वाजता घरात जात असताना त्याच्या घरातून दोन व्यक्ती बाहेर येत असल्याचे त्याला दिसून आलं त्यानंतर त्या मुलाने घरात प्रवेश केला असता त्याची आई आशा बिछाण्यावर बेशुद्ध अवस्थेत पडलेल्या दिसली. त्याने आईला उठवण्याचा प्रयत्न केला पण त्यांच्याकडून कोणताच प्रतिसाद मिळाला नाही… त्यानंतर घाबरलेल्या मुलाने तात्काळ या घटनेबाबतची माहिती वडिलांना दिली. फ्रेजरपुरा पोलिसांनी घटनास्थळी येत पंचनामा केला. आशा यांच्या गळ्यावर व्रण असल्याचे आढळून आले.
दरम्यान या घटनेप्रकरणी काल रात्री पोलीस महिलेचे पती राहुल तायडे याला पोलिसांनी अटक केली आहे. पती राहुल तायडे हाच पत्नीच्या हद्यप्रकरणी कारणीभूत असल्याचा संशय पोलिसांना आहे. याप्रकरणी मृतक महिला पोलीस अंमलदारांच्या बहिणीच्या तक्रारीवरून राहुल तायडे याची सध्या पोलिसांकडून चौकशी सुरू आहे. या घटनेत मृत्यूचे कारण अद्याप अस्पष्ट आहे. महिला पोलीस अंमलदाराचा शवविच्छेदन केल्यानंतर अहवाल आल्यानंतरच मृत्यूचं नेमकं कारण स्पष्ट होईल. डीसीपी गणेश शिंदे यांच्यासह पोलीस अधिकारी या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत. मात्र या घटनेमुळे परिसरासह पोलिस विभागामध्ये सुद्धा खळबळ उडालीये.

खरंतर एका महिला पोलिसाचीच दिवसा ढवळ्या अशाप्रकारे हत्या झाल्याने सामान्य माणसाचं काय असा प्रश्न उपस्थित होत होता? मात्र सध्या या प्रकरणात संशयाची सुई महिला पोलिसाच्या पतीवर असून या प्रकरणात नवी कोणती माहिती उजेडात येते हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे

 

Share This News
error: Content is protected !!