SHIVSENA PROTEST ON PRITHWIRAJ CHAVAN: माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांच्या एका वक्तव्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा मोठा वाद निर्माण झालाय.
‘भगवा दहशतवाद’ न म्हणता, ‘हिंदू दहशतवाद’ असा शब्दप्रयोग केला पाहिजे, असं चव्हाण यांनी म्हटलं..
VIDEO NEWS:राजकीय विजनवासात गेलेले पृथ्वीराज चव्हाण पुन्हा कसे आले चर्चेत
त्यामुळे विधानसभेतील पराभवानंतर राजकीय विजनवासात गेलेले चव्हाण या वक्तव्यामुळे आणि शिवसैनिकांच्या आंदोलनामुळे पुन्हा चर्चेत आलेत.. SHIVSENA PROTEST ON PRITHWIRAJ CHAVAN:
विधानसभा निवडणुकीत काँग्रेसचा पराभव झाल्यानंतर पृथ्वीराज चव्हाण यांनी काँग्रेसच्या नेतृत्वावर टीका केली होती.
त्यानंतर चव्हाण हे सार्वजनिक कार्यक्रमात कधीतरी दिसत होते, त्यामुळे ते विजनवासात गेले असल्याची चर्चा सुरू झाली.
मालेगाव बॉम्बस्फोटावरील निकालावर त्यांनी केलेल्या विधानमुळे विजनवासात गेलेले चव्हाण हे पुन्हा ‘प्रकाशझोतात’ आले.
Pune News : कोथरुड पोलिसांच्या चौकशीत तरुणींना जातीवाचक शिवीगाळ? सुप्रिया सुळे आक्रमक
मालेगावच्या निकालावर प्रतिक्रिया देताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ‘आतंकवाद भगवा न कभी था, ना है, ना कभी रहेगा’ असे टि्वट केले होते.
त्यावरही बोलताना भगवा हा शब्द वापरू नका. भगवा हा आमच्यासाठी महत्त्वाचा रंग आहे. तो महाराजांचा ज्ञानेश्वरीचा रंग आहे. सनातनी दहशतवाद म्हणा.
किंवा हिंदु दहशतवाद हा शब्दप्रयोग केला पाहिजे पृथ्वीराज चव्हाण म्हणाले होते..
त्यांच्या या विधानानंतर हिंदूंची मने दुखावली गेली, हा सनातन धर्माचा अपमान असल्याचे शिंदेंच्या शिवसेनेने म्हटलं ..
चव्हाण यांच्या वक्तव्याविरोधात मुंबईत टिळक भवनासमोर शिवसैनिक आक्रमक झाले पृथ्वीराज चव्हाण यांनी माफी मागावी या मागणीसाठी अडून बसले..
त्यामुळे विधानसभेतील पराभवानंतर राजकीय विजनवासात गेलेले पृथ्वीराज चव्हाण पुन्हा एकदा शिवसैनिकांमुळे प्रकाश झोतात आल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे…
BAHAVESH KANKARANI NEWS : पिंपरी चिंचवड हादरलं! भरदिवसा बाजारात तरुणासोबत नेमकं काय झालं ?
आता या शिवसैनिकांच्या आक्रमक पवित्र नंतर पृथ्वीराज चव्हाण माफी मागतात का हे पाहणं आता महत्त्वाचं असणार आहे.
YAVAT NEWS: यवतमध्ये दोन गटात तणाव; काय घडलं?
BARAMATI NEWS: बारामती हादरलं…! 24 तासांत एकाच कुटुंबातील चौघांचा मृत्यू