PCMC POLICE: नागरिकांनी कष्टाने कमावलेला मात्र अज्ञात चोरांकडून आणि दरोडेखोरांकडून लुबाडण्यात आलेला तब्बल 6 कोटी रुपयांचा मुद्देमाल पोलिसांकडून परत करण्यात आलाय.
पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या वतीने 231 तक्रारदारांना हा मुद्देमाल सुपूर्त करण्यात आला. PCMC POLICE:
VIDEO NEWS: किरकोळ चोरी ते जबरी दरोड्यांची उकल पिंपरी-चिंचवड पोलिसांनी सुपूर्द केला 6 कोटींचा ऐवज
पिंपरी चिंचवडचे पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे यांच्या संकल्पनेतून पोलीस मुख्यालय, निगडी येथे हा विशेष कार्यक्रम पार पडला.
या परत केलेल्या मुद्देमालामध्ये मौल्यवान वस्तू, 17 लाख रुपये किमतीचे 33 तोळे सोन्याचे दागिने, 41 लाख रुपयांची 6 वाहने, 5 कोटी 15 लाख रुपयांची रोख रक्कम आणि 30 लाख रुपये किमतीचे 167 मोबाईल हँडसेट्स यांचा समावेश आहे.
DAYA NAYAK BIOGRAPHY: गुन्हेगारी जगताचा कर्दनकाळ एन्काऊंटर स्पेशलिस्ट दया नायक निवृत्त
चोरी आणि दरोड्याच्या विविध गुन्ह्यांचा तपास पूर्ण झाल्यानंतर आरोपींकडून हस्तगत केलेला हा मुद्देमाल लवकरात लवकर मूळ मालकांना परत करण्यासाठी हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.
त्यासाठी त्वरित न्यायालयीन प्रक्रिया देखील पार पाडण्यात आली. व आज हा कार्यक्रम घेत मुद्देमाल सुपूर्त करण्यात आला.
चोरांनी लुबाडलेली आपल्या कष्टाची मेहनत परत मिळाल्यामुळे तक्रारदारांचा चेहऱ्यावर हास्य आणि आनंदाश्रु दिसून आले.
दरम्यान या कार्यक्रमात बोलताना पोलीस आयुक्तांनी सायबर फ्रॉड पासून दूर राहण्याचं आवाहनही केलं.
AMRAVATI POLICE NEWS: गळ्यावर व्रण, महिला पोलिसाच्या बाबतीत काय घडलं?