पुण्याच्या पिंपरी चिंचवड मधून एक मोठी बातमी आता समोर येत आहे. पिंपरीतील कॅम्प मार्केटमध्ये भर दिवसा भर बाजारपेठेत व्यापारी तरुणावर गोळीबार झाल्याची घटना घडली आहे. एवढेच नाही तर गळ्यातला सोन्याचा ऐवज आहे लंपास केल्याची माहिती आहे. भावेश कंकरानी (BAHAVESH KANKARANI NEWS ) यांच्यावर गोळीबार झाल्याची माहिती समोर आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार पिंपरी कॅम्प मार्केटमध्ये बाजारपेठेत व्यापारी तरुणावर गोळीबार झाल्याची घटना घडली. या घटनेत तरुणाच्या पायाला गोळी लागल्याची माहिती समोर आली आहे. गोळीबारात व्यापारी जखमी झाला असून त्याच्या गळ्यातील सोन्याचा ऐवज देखील पळवल्याची माहिती आहे.
भावेश कंकरानी असं या व्यापारी तरुणाचं नाव असून त्याच्या दुकानासमोर अज्ञात गुन्हेगाराने गोळीबार केला. गोळीबार झाल्याने भावेश कंकरानी गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर पिंपरीतील एका खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या घटनेची माहिती मिळताच पिंपरी चिंचवड पोलीस दलातील वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. मात्र भर दिवसा भर बाजारपेठेत व्यापारी तरुणावर अशा पद्धतीने गोळीबार झाल्याने परिसरातील नागरिकांमध्ये दहशत निर्माण झाली आहे.
भर दिवसा भर बाजारपेठेत अशा प्रकारे गोळीबार झाल्यामुळे घटनास्थळी काही काळ तणाव निर्माण झाला होता. शिवाय आरोपीवर कठोरात कठोर कायदेशीर कारवाई करावी अशी मागणी स्थानिक नागरिक तसेच व्यापाऱ्यांनी केली आहे. हा गोळीबार नेमका चोरीच्या उद्देशाने केला की दुसऱ्या कोणत्या करणाने केला हे लवकरच समोर येईल.