DAUND YAVAT NEWS : यवत मध्ये नेमकं घडलं काय? जबाबदार कोण? वाचा A TO Z स्टोरी

DAUND YAVAT NEWS : यवत मध्ये नेमकं घडलं काय? जबाबदार कोण? वाचा A TO Z स्टोरी

341 0

पुणे जिल्ह्यातील दौंड तालुक्यातील यवत मध्ये (DAUND YAVAT ) दोन गटात तणाव निर्माण झाला. दगडफेक आणि जाळपोळ ही झाली. तणाव इतका वाढला की, जमावाला पांगवण्यासाठी अश्रुधराच्या नळकांड्याही फोडव्या लागल्या. यवत मध्ये नेमकं काय घडलं?

या प्रकरणाची खरी सुरुवात झाली ती 26 जुलै ला. दौंड तालुक्यातल्या यवत येथील रेल्वे स्टेशन जवळील निळकंठेश्वर मंदिरात असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीची रात्री एका अज्ञात व्यक्तीने विटंबना केल्याची घटना घडली होती. या घटनेचे तीव्र पडसाद यवतसह दौंड तालुक्यात उमटले पाहायला मिळाले. गावागावात या घटनेचा निषेध व्यक्त करण्यात आला. एवढेच नाही तर यवत मध्ये नागरिकांकडून सर्व व्यवहार बंदही करण्यात आले होते.
त्यानंतर भाजप आमदार गोपीचंद पडळकर आणि राष्ट्रवादीचे आमदार संग्राम जगताप यांच्या उपस्थितीमध्ये हिंदुत्ववादी संघटनांकडून मोठा मोर्चा काढत या घटनेचा तीव्र निषेध नोंदवण्यात आला होता. त्यानंतर आज सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट टाकण्यात आल्यानं तणाव निर्माण झाल्याची माहिती समोर आली. त्यानंतर आज दुपारच्या सुमारास यवत मध्ये दोन्ही गटाकडून तुफान दगडफेक करण्यात आली. त्यानंतर मोठा तणाव निर्माण झाला. जमावाकडून दुचाकीची जाळपोळ करण्यात आली. तर चारचाकी गाड्यांचीही तोडफोड करण्यात आली. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांनी अश्रुधूराच्या नळकांड्या फोडल्या. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी दौंडच्या प्रत्येक भागात पोलीस होते. आक्षेपार्ह पोस्ट करणाऱ्या व्यक्तीसह दोघांना पोलिसांनी ताब्यात घेतलं. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक संदीप गील यांची सुद्धा घटनास्थळी उपस्थिती होती. त्यानंतर यवत पूर्णपणे बंद ठेवण्यात आलं. परिस्थिती नियंत्रणात आणण्यात आली. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी देखील यवत मध्ये जाऊन परिस्थितीचा आढावा घेतला. यवत मधील परिस्थिती पूर्णपणे नियंत्रणात असून यवतमध्ये 48 तासांकरिता 144 कलम लागू करण्यात आल्याची माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली.

यवतमधील परिस्थिती सध्या नियंत्रणात असून या ठिकाणी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. सध्या यवत मध्ये शांततापूर्ण वातावरण आहे. टॉप न्यूजच्या वतीने आम्ही आवाहन करतो की, नागरिकांनी शांतता राखावी. कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये. प्रशासनाला पूर्णपणे सहकार्य करावं.

 

Share This News
error: Content is protected !!