पुणे महानगरपालिकेत भाजपचे 100 हून अधिक नगरसेवक निवडून येतील – जगदीश मुळीक

422 0

पुणे- निवडणुका कधीही झाल्या तरी भाजप निवडणुकीसाठी सज्ज असून पुणे महापालिकेत भाजपचे शंभरहून अधिक नगरसेवक निवडून येतील असा विश्वास शहर अध्यक्ष जगदीश मुळीक यांनी व्यक्त केला.

मुळीक म्हणाले, ” गेल्या पाच वर्षांत महापालिकेच्या माध्यमांतून केलेली विकासकामे, पक्षाने कोरोना काळात केलेले सेवा कार्य, बूथ स्तरापर्यंतची भक्कम संघटनात्मक यंत्रणा आणि पुणेकरांचा विश्वास या जोरावर भाजपची महापालिकेत पुन्हा सत्ता येईल, असा ठाम विश्वास असून ओबीसींच्या आरक्षणाशिवाय स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार हे आजच्या सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशामुळे स्पष्ट झाले आहे. महाविकास आघाडी सरकारला ट्रिपल टेस्ट पूर्ण करून हे आरक्षण पुन्हा लागू करणे शक्य होते. परंतु गेल्या दोन वर्षांत इम्पिरिकल डेटा गोळा करून तिहेरी चाचणी पूर्ण करता आली असती”

न्यायालयात ओबीसींची बाजू मांडण्यात महाविकास आघाडी अपयशी ठरली. महाविकास आघाडी सरकारच्या राजकीय उदासीनतेमुळे ओबीसींना राजकीय आरक्षण गमवावे लागलं असल्याचं मत मुळीक यांनी यावेळी व्यक्त केलं

Share This News
error: Content is protected !!