BARAMATI NEWS: बारामतीत (BARAMATI) काल सकाळच्या सुमारास डंपर आणि बाईकच्या भीषण अपघातात वडील आणि दोन मुलींचा मृत्यू झाला.
मुलगा आणि नातींच्या अशाप्रकारे दुर्दैवी मृत्यूच्या धक्क्याने मृत व्यक्तीच्या वडिलांचाही आज मृत्यू झाला.
एकाच कुटुंबातील चार जणांच्या मृत्यूमुळे संपूर्ण बारामती वर शोककळा पसरलीये
रविवारी 27 तारखेला सकाळी 11 वाजण्याच्या सुमारास बारामतीतील मोरगाव रस्त्यावरील महात्मा फुले चौकात डंपर आणि दुचाकीचा भीषण अपघात झाला.
या अपघातात वडील आणि त्यांच्या दोन मुलींचा दुर्दैवी मृत्यू झाला.
या घटनेत दुचाकी ही डंपरच्या चाकाखाली आली त्यामुळे वडील चाकाखाली चिंगरले गेले.
या घटनेमध्ये ओंकार आचार्य यांचा जागीच मृत्यू झाला तर 5 वर्षांची मधुरा आणि दहा वर्षाची सई या दोघीही गंभीर जखमी झाल्या होत्या.
मात्र दवाखान्यात उपचारासाठी नेण्यापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला.
या घटनेमुळे आचार्य कुटुंबाला मोठा धक्का बसला. मुलगा आणि दोन नातींचा अशाप्रकारे मृत्यू झाल्याचा धक्का
सहन न झाल्यामुळे ओंकार यांचे वडील राजेंद्र श्रीनिवास आचार्य यांचे आज पहाटे निधन झाले. ते निवृत्त शिक्षक होते.
24 तासांत एकाच कृटुंबातील चौघांचा मृत्यू झाल्याने संपूर्ण बारामती मध्ये शोककळा पसरलीये.
या अपघात प्रकरणी पोलिसांनी ट्रक चालकाला अटक केली असून पोलीस आधीक तपास आहेत.
Junner Crime News : जुन्नर मधील रिव्हर्स वॉटरफॉल जवळील दरीत आढळले मृतदेह
यापूर्वी सुद्धा पुण्यामध्ये अवजड वाहनांच्या धडकेमध्ये अनेकांनी आपला प्राण गमावला आहे.
अवजड वाहनांच्या वाहतुकीवर अंकुश लावण्यात वाहतूक विभाग कमी पडतायेत का?
असा प्रश्न सध्या निर्माण झाला आहे.
 
                         
                                 
                             
                             
                             
                            