HOTEL BHAGYASHREE: “नाद करतो काय, यायलाच लागतंय” ही वाक्य सध्या लहान मोठ्यांच्या ओठांवर आहेत. कारण आहे हॉटेल भाग्यश्री..
17 कापलीत, दहा शिजायला घातलीत, ओरिजनल ढवारा मटन थाळी…
असे डायलॉग मारून प्रसिद्ध झालेले हॉटेल भाग्यश्रीचे (HOTEL BHAGYASHREE) मालक नागेश मडके (NAGESH MADAKE) यांचं अपहरण करून बेदम मारहाण झाल्याच्या बातम्या वाऱ्याच्या वेगात पसरल्या.
HOTEL BHAGYASHREE HOTEL OWNER NEWS: सेल्फीच्या बहाण्यानं हॉटेल भाग्यश्रीच्या मालकासोबत काय घडलं?
मात्र या बातम्या खऱ्या आहेत ?
की निव्वळ स्टंटबाजी असा प्रश्न नेटकऱ्यांकडून विचारला जातोय..
नेमकं हे प्रकरण काय आहे पाहूया…
HOTEL BHAGYASHREE OWNER AUDIO CLIP: हॉटेल भाग्यश्रीच्या मालकाला धमकी
धाराशिवमधील प्रसिद्ध हॉटेल भाग्यश्रीच्या मालकाला मारहाण झाल्याचं समोर आल्यानं एकच खळबळ उडाली.
बुधवारी सायंकाळी हॉटेल भाग्यश्रीचे मालक नागेश मडके यांना फोटो काढण्याच्या बहाण्याने काही लोकांनी कारमध्ये बसवलं.
याच कार मधून त्यांचं अपहरण करण्यात आलं.
त्यांना बेदम मारहाण करून पाच किलोमीटर दूरवर असलेल्या एका पुलाजवळ फेकून देण्यात आलं.
यादरम्यान गाडीत असताना त्यांच्या डोक्याला पिस्तूल लावल्याचा दावाही त्यांनी केला.
हा सर्व प्रकार त्यांनी स्वतःच व्हिडिओच्या माध्यमातून सांगितला.
हा प्रकार समोर येताच राज्यभरात एकच खळबळ उडाली.
“नाद करतो काय, यायलाच लागतंय”, असं म्हणत अल्पावधीत प्रसिद्ध झालेल्या हॉटेल भाग्यश्री च्या मालकाला सहानुभूती मिळाली.
व्यवसायात उभारी घेत असलेल्या मराठी माणसाला जाणून-बुजून रोखण्याचा प्रयत्न केला जात आहे.
अशा कमेंट सोशल मीडियावर यायला लागल्या. अनेक स्थानिक माध्यमांनी नागेश मडके यांच्या मुलाखती घेतल्या.
त्यांचे रुग्णालयात उपचार घेत असतानाचे व्हिडिओही व्हायरल झाले. मात्र इतकं सगळं होऊनही या प्रकरणात अजूनही एफआयआर दाखल झालेली नाही.
तीन दिवस होऊन गेले तरीही पोलीस दखल घेत नसल्यानं मडके आणि त्यांच्या कुटुंबाने पोलीस ठाण्याच्या बाहेर आंदोलन केलं. आज तर थेट आत्मदहन करण्याचा इशारा सुद्धा त्यांनी दिला होता. तरीही पोलीस तक्रार झालीच नाही.
दुसरीकडे हॉटेल भाग्यश्रीच्या मालकाला मिळत असलेली सहानुभूती देखील कमी झाली. आणि मालकाकडून स्टंटबाजी केली जात असल्याची टीका होऊ लागली. स्थानिकांकडून मिळालेल्या माहितीनुसार हॉटेल भाग्यश्री च्या मालकाबरोबर तीन ते चार बॉडीगार्ड असतात तरीही सायंकाळी वर्दळीच्या वेळी त्यांचं अपहरण कसं झालं ?
अपहरण करून ज्या ठिकाणी त्यांना फेकल्याचं सांगण्यात आलं ते ठिकाण केवळ अडीच ते पावणेतीन किलोमीटर लांब आहे.
मग आपल्याला पाच किलोमीटर लांब फेकल्याचा दावा त्यांनी का केला ? अपहरण करून फेकण्यापर्यंतच्या मार्गातील कुठल्याच सीसीटीव्ही मध्ये हा प्रकार कैद कसा नाही झाला ? जर मारहाण करून गाडीतून फेकून देण्यात आलं तर त्यांना इतकी किरकोळ दुखापत कशी झाली ? असे प्रश्न उपस्थित होत आहेत.
अर्थात हे प्रश्न नेटकऱ्यांबरोबरच संपूर्ण महाराष्ट्राला पडलेत. तर दुसरीकडे नागेश मडके
यांच्या जबाबात वारंवार विसंगती आढळत असल्याने त्यांनी अपहरणाचा बनाव रचल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.
याचबरोबर श्रावण महिना चालू झाल्याने नॉनव्हेज खाणाऱ्यांची संख्या झपाट्याने कमी होते.
त्यामुळेच आपल्या हॉटेलची क्रेझ कमी होऊ नये, म्हणून चर्चेत राहण्यासाठी ही स्टंटबाजी केली जात असल्याचा आरोपही केला जातोय.
याचमुळे कदाचित पोलिसांनी तीन दिवस उलटूनही या प्रकरणातील एफआयआर अजूनही दाखल करून घेतलेली नाही.
हॉटेल भाग्यश्रीचे मालक नागेश मडके यांनी स्वतः स्वतःच्या अपहरणाचा बनाव रचल्याचे टीका त्यांच्यावर होत आहेत.
जर हा बनाव असेल तर तो नेमका का रचला ? अपहरणाचा बनाव रचण्यामागे बंदुकीचा परवाना मिळवण्याचा उद्देश असल्याची शंका उपस्थित करण्यात येत आहे.
गेल्या काही वर्षांमध्ये पोलिसांकडून बंदुकीचा परवाना मिळवण्यासाठी स्वतःवर हल्ला झाल्याचा किंवा अपहरण झाल्याचा बनाव रचल्याची अनेक प्रकरणं उघडकीस आली आहेत. त्याच अनुषंगाने हा स्टंट केल्याचा आरोप करण्यात येत आहे. अर्थात या मागची सत्यता पडताळणं तपास यंत्रणांचं काम आहे.
मात्र ज्या नेटकऱ्यांनी सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल करून हॉटेल भाग्यश्रीला प्रसिद्ध केलं, प्रेम दिलं तेच नेटकरी आज टीका करताना दिसत आहेत.
तर दुसरीकडे आम्ही गरीब लोक आहोत आम्हाला बंदुकीचा परवाना नकोय.
आम्ही फक्त अन्यायाविरोधात दाद मागत आहोत, असं नागेश मडके यांचं म्हणणं आहे.
अर्थात यामध्ये पोलिसांनी कुठलाही अधिकृत स्टेटमेंट न दिल्यामुळे हा नेमका प्रकार काय आहे याबाबतची शंका कायम आहे.