PRASAD TAMDAR NEWS: भक्तांच्या मोबाईलचा ॲक्सेस घेऊ त्यांचे खाजगी क्षण पाहणारा समलिंगी भोंदू बाबा
प्रसाद तामदार (PRASAD TAMDAR) हा सध्या न्यायालयीन कोठडीत आहे.
दुसरीकडे त्याच्या मठाच्या बाहेर अजूनही भाविक दर्शनासाठी येतायेत.
PRASAD TAMDAR NEWS तर तिकडे आमच्या सोशल मीडियाच्या माध्यमातून प्रसाद तामदार प्रसिद्ध झाला.
त्यात सोशल मीडियावरून त्याची इमेज क्लीन करण्याचे प्रयत्न सुरू झालेत.
PRASAD DADA TAMDAR: प्रसाद तामदारच्या सोशल मीडियावरून असलेले व्हिडिओ डिलीट
सुस गावात असलेल्या श्री स्वामी समर्थांच्या मठाच्या माध्यमातून
भक्तांचा आर्थिक, शारीरिक लैंगिक छळ
करणारा प्रसाद तामदार पोलिसांच्या ताब्यात आहे.
त्याने भक्तांच्या मोबाईल मध्ये एअर ड्राईड कीड नावाचं मोबाईल ॲप इन्स्टॉल केलं.
त्यातून भक्तांच्या मोबाईलचा ऍक्सेस घेऊन त्यांचे खाजगी क्षण पाहिले.
अनेक भक्तांना मृत्यूची तारीख लिहून देत मरणाची भीती घातली.
मृत्यू दूर करायचा असेल तर गर्लफ्रेंड बरोबर
किंवा वेश्यांबरोबर शारीरिक संबंध ठेवायला सांगितले.
हे शारीरिक संबंध मोबाईल कॅमेऱ्याच्या माध्यमातून स्वतः
पाहिले आणि रेकॉर्डही करून ठेवले.
एवढेच काय तर अनेक भक्तांना नशेच्या गोळ्या देऊन त्यांच्याबरोबर समलिंगी संबंध ठेवले.
या सगळ्या भयंकर प्रकाराने पुणे पिंपरी चिंचवड हादरून गेलं.
या बाबाला सुरुवातीला पोलीस कोठडी आणि आता न्यायालयीन कोठडी मिळाली आहे.
एकीकडे त्याचे जामीनासाठी प्रयत्न सुरु आहेत.
तर दुसरीकडे ज्या सोशल मीडिया वरून
त्याने प्रसिद्धी मिळवली त्याच सोशल मीडियावर
त्याची इमेज क्लीन केली जात आहे.
प्रसाद तामदार हा सोशल मीडियावर प्रचंड ऍक्टिव्ह होता.
त्याला कशी दिव्यदृष्टी प्राप्त झाली आहे, तो कसा
भक्तांच्या समस्यांचं निवारण करतो.
त्याच्यामुळे भक्त कसे सुखी जीवन जगतात,
याविषयीचे व्हिडिओ दररोज त्याच्या सोशल मीडियावर पडत होते.
त्यामुळेच तो राज्यभरात प्रसिद्ध झाला. संपूर्ण राज्यातून लोक त्याच्याकडे येऊ लागले.
आणि बघता बघता दोन वर्षात हा भोंदू बाबा करोडपती झाला.
तो अटकेत असल्यापासून त्याच्या सोशल मीडियावर
कोणत्याही नव्या व्हिडिओ येत नव्हत्या.
मात्र आता कदाचित त्याचं सोशल मीडिया सांभाळणारे
लोक पुन्हा ऍक्टिव्ह झालेत.
अर्थात त्याच्या पेजवर नवे व्हिडिओ येत नाहीयेत.
मात्र अनेक जुने आणि संशयास्पद व्हिडिओ
डिलीट केले जात आहेत.
गेल्या आठ दहा दिवसात बाबाच्या पेजवरून महिला
भक्तांना मिठ्या मारतानाचे, पुरुष भक्तांना आंघोळ घालतानाचे व्हिडिओ डिलीट केले जात आहे.
बऱ्याच व्हिडिओचे THUMBNAIL बदलून अतिशय सभ्य फोटो टाकण्यात आलेत.
त्यामुळे ज्या सोशल मीडियाने बाबाला प्रसिद्ध केलं, त्यात सोशल मीडियामुळे आणि बातम्यांमुळे
त्याच्या काळ्या कारणाम्यांचा पर्दाफाश झाला, त्याच सोशल मीडियावर बाबा कसा चांगला आहे,
आणि त्याच्यावर झालेले आरोपकसे खोटे आहेत हे
भासवण्याचा प्रयत्न चालू असल्याची शंका निर्माण होत आहे.