भोंगा, दंगा, पंगा आणि जातीय तेढ यापासून दूर रहा; पुणे पोलिसांचं कवितेतून आवाहन

537 0

पुणे- महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मशिदीवरील भोंगे बाबत राज्य सरकारला दिलेला अल्टीमेटम आज संपत असून याच मुद्द्यावरून मनसे चांगलीच आक्रमक झाला असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.

मशिदींवरील भोंगे उतरले नाहीत तर त्याच ठिकाणी हनुमान चालीसा लावण्याचं आवाहन राज ठाकरे यांनी मनसैनिकांना केलं आहे.
दरम्यान याच पार्श्‍वभूमीवर पुणे पोलिसांकडून एक ट्विट करण्यात आलं असून भोंगा, दंगा, पंगा आणि जातीय तेढ यापासून दूर रहा असं भावनिक आवाहन या ट्विट मधून करण्यात आलं आहे.

हे तरुणाई, तुझ्यासाठी..!

पुण्यनगरी ही राजधानी असे सर्व शिक्षणाची
संस्कृती शिकण्या येथे मांदीयाळी तरुणाईची
नको आम्हा भोंगा, दंगा, पंगा अन जातीय तेढ
सामाजिक सलोख्याची उभारु या मुहूर्तमेढ..!
गुण्यागोविंदे नांदण्या, एकमेकां समजून घेऊ,
अवघे धरू सुपंथ..! असं ट्विट पुणे पोलिसांनी केलं आहे.

Share This News
error: Content is protected !!