PRADA TEAM VISITS KOLHAPUR : कोल्हापूरच्या चप्पल व्यवसायाला आता उभारी मिळण्याची आशा आहे. इटालियन लक्झरी फॅशन ब्रँड प्राडा कपंनीच्या तांत्रिक समितीचे शिष्टमंडळ कोल्हापुरात दाखल झालं. चप्पल तयार करणाऱ्या कारागिरांच्या कार्यशाळांनाही भेटी दिल्या. (PRADA TEAM VISITS KOLHAPUR)
महादेव मुंडे खून प्रकरणातील आरोपी मोकाट, ज्ञानेश्वरी मुंडेंनी केलं विष प्राशन
महिन्याभरापूर्वी मिलान फॅशन शोमध्ये ‘टो-रिंग सँडल्स’ या नावाने कोल्हापुरी चप्पलच्या हुबेहूब डिझाईनचं सादरीकरण केलं होतं. त्यामध्ये मात्र कोल्हापूरचा कोणताही उल्लेख नव्हता. यावरून देशभरामधून विविध प्रतिक्रिया उमटल्या होत्या. आणि त्याच पार्श्वभूमीवर प्राडा कंपनीला प्रत्यक्ष कोल्हापुरात येऊन इथल्या कारागिरांची भेट घ्यावी लागली. प्राडा कंपनीच्या विकास विभागाचे (PRADA TEAM VISITS KOLHAPUR) संचालक आंद्रे बॉक्सरो, उत्पादन विभागाचे संचालक पाओलो टिव्हरॉन, फुटवेअर विभागाचे व्यवस्थापक डॅनियल कोंटू तसेच तांत्रिक सल्लागार अंद्रिया आणि रॉबर्तो पोलास्ट्रेली भारतीय प्रतिनिधी गौतम मेहरा यांचा समावेश होता. यावेळी कोल्हापुरी चप्पल कशा पद्धतीने तयार होते हे पाहण्यासाठी त्यांनी विविध कार्यशाळांना भेटी दिल्या. कोल्हापुरी चपलेतील रेखीव डिझाईन हस्तकला दर्जा आणि पारंपारिक पद्धतीने तयार होणारे उत्पादन पाहून कारागिरांचं भरभरून कौतुकही केलं याशिवाय छोट्या आकाराचा कोल्हापुरी चपलेच किचेन आपल्यासोबत नेण्याचा मोह त्यांना आवरता आला नाही.
*TOP NEWS MARATHI : प्रवीण गायकवाड हल्ला प्रकरण, 18 जुलै रोजी अक्कलकोट बंदची हाक
प्राडा सारखा आंतरराष्ट्रीय ब्रँड कोल्हापुरात येणे हे मोठं यश मानलं जात आहे. यानिमित्ताने मोठे बदल होण्याची आणि कोल्हापुरी चप्पल ला जागतिक ब्रँड बनवण्याची शक्यता निर्माण झाली आहे. केवळ कोल्हापुरी चप्पलच नाही तर साज, ठुशी, पैंजण, पैठणी आदिवासी महिलांच्या वारली गारमेंट जगभरात पोहोचवण्यासाठी सहकार्य करण्याची ग्वाही प्राडाने दिली आहे. त्यामुळे लोकल ब्रँड ग्लोबल होण्याची आशा आहे.
कोल्हापुरी चपलेचा ठसा आता फक्त मातीत नाही, तर आंतरराष्ट्रीय फॅशन रॅम्पवर उमटण्याची आशा आहे. प्राडासारख्या लक्झरी ब्रँडकडून कोल्हापुरात भेट हा केवळ एक प्रवास नव्हे, तर आपल्या परंपरेला मिळालेलं जागतिक मान्यतेचं सर्टिफिकेट आहे. आता खऱ्या अर्थाने कोल्हापुरी चप्पलचा ‘लोकल टू ग्लोबल’चा प्रवास सुरू झालाय… आणि ही त्याची पहिली पायरी आहे. साध्या इथेच थांबतोय ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा टॉप न्यूज मराठी