WHO IS SHSHIKANT SHINDE: राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे (NCP SP) अध्यक्ष शरद पवार (SHARAD PAWAR) यांनी भाकरी फिरवत प्रदेशाध्यक्षपदी (WHO IS SHSHIKANT SHINDE) शशिकांत शिंदे (SHASHIKANT SHINDE) यांची निवड केली..

WHO IS SHSHIKANT SHINDE: माथाडी नेता ते प्रदेशाध्यक्ष; कसा आहे शशिकांत शिंदेंचा राजकीय प्रवास

309 0

WHO IS SHSHIKANT SHINDE: राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे (NCP SP) अध्यक्ष शरद पवार (SHARAD PAWAR) यांनी भाकरी फिरवत प्रदेशाध्यक्षपदी (WHO IS SHSHIKANT SHINDE) शशिकांत शिंदे (SHASHIKANT SHINDE) यांची निवड केली..

आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या आधी प्रदेशाध्यक्षपदी शशिकांत शिंदे यांची निवड झाल्याने

राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा आहे

VIDEO NEWS: SHASHIKANT SHINDE NEW PRESIDENT NCP SP : शशिकांत शिंदे नवे प्रदेशाध्यक्ष

शरद पवारांनी भाकरी फिरवत प्रदेशाध्यक्षपदी शशिकांत शिंदे यांची नियुक्ती केली.

या आधी जयंत पाटील (JAYANT PATIL)  प्रदेशाध्यक्ष पदावर कार्यरत होते.

त्यांच्याच नेतृत्त्वाखाली पक्षानं लोकसभा (LOKSABHA) आणि विधानसभेची निवडणूक लढवली.

लोकसभेला पक्षाचा घवघवीत यश मिळालं. तर विधानसभेला पक्षाचा दारुण पराभव झाला.

यानंतर आता शरद पवारांनी जयंत पाटील यांच्या जागी शशिकांत पाटील यांना संधी दिली आहे.

विधानसभेत सहाव्या क्रमांकावर फेकल्या गेलेल्या

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाला पुन्हा पूर्वीचे दिवस मिळून देण्यासाठी

सातारच्या जनतेने कायम शरद पवारांची साथ दिली.

SHASHIKANT SHINDE: जयंत पाटलांचा राजीनामा; शशिकांत शिंदे राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे नवे प्रदेशाध्यक्ष

त्यामुळे सातारचे शशिकांत शिंदे यांची प्रदेशाध्यक्षपदी निवड करण्यात आली.

पश्चिम महाराष्ट्र आणि सातारा जिल्हा शरद पवार गटाचा बालेकिल्ला मानला जातो.

त्यामुळे शशिकांत शिंदे यांनी प्रदेशाध्यक्षपद देऊन मोठी राजकीय खेळी खेळल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे.

शशिकांत शिंदे यांचं मूळ गाव सातारा जिल्ह्यातील जावळी तालुक्यातील हुमगाव आहे..

ते वाणिज्य शाखेचे पदवीधर आहेत..

61 वर्षीय शशिकांत शिंदे हे माथाडी कामगारांचे प्रभावी नेते म्हणूनही प्रसिद्ध आहेत..

ते लहानपणापासूनच समाजकारण आणि राजकारणात सक्रिय आहेत.

शशिकांत शिंदे यांनी 4 वेळा विधानसभेचे सदस्य म्हणून काम केलं..

शशिकांत शिंदे यांनी 1999 साली पहिल्यांदा विधानसभा निवडणूक लढवली आणि

जावळी विधानसभा मतदारसंघातून 12,000 मतांच्या फरकाने प्रथम विजयी झाले.

त्यानंतर 2004 मध्ये ही त्यांनी जावळी विधानसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व केलं..

त्यानंतर त्यांनी
2009 ते 2014 असे दोन टर्म कोरेगाव मतदारसंघाचे नेतृत्त्व केले.

त्याच बरोबर महाराष्ट्र राज्याच्या कृष्णा खोरे पाटबंधारे महामंडळाचे जलसंपदामंत्री म्हणून काम पाहिले.

शशिकांत शिंदे यांनी नवी मुंबई बाजार समितीचं सचिव म्हणून काम पाहिलं आहे.

2019 साली विधानसभा निवडणुकीत त्यांचा महेश शिंदे यांच्याकडून पराभव झाला.

2024 विधानसभा निवडणुकीत पुन्हा त्यांचा शिवसेना शिंदे गटाचे महेश शिंदे यांनी पराभव केला..

पक्षफुटीनंतर शरद पवारांसोबत राहिलेल्या शशिकांत शिंदे यांना पक्षानं 2024 मध्ये झालेल्या लोकसभेचं तिकीट दिलं.

त्यांनी उदयनराजे भोसलेंना कडवी लढत दिली. तुतारीसारखंच चिन्ह घेऊन लढणाऱ्या उमेदवारामुळे शिंदे यांचा पराभव झाला.

भोसलेंना 5 लाख 68 हजार 749, तर शिंदे यांना 5 लाख 36 हजार 475 मतं मिळाली.

Share This News
error: Content is protected !!