DEEPAK ANKURKAR NAGPUR NEWS: मुंबईतील पोलीस उपनिरीक्षकाचा मित्राच्या पत्नीवर अतिप्रसंग

DEEPAK ANKURKAR NAGPUR NEWS: मुंबईतील पोलीस उपनिरीक्षकाचा मित्राच्या पत्नीवर अतिप्रसंग

198 0

DEEPAK ANKURKAR NAGPUR NEWS:  पोलीस खात्यातील एक अत्यंत धक्कादायक आणि लाजीरवाणी घटना समोर आली आहे.

मुंबईतील विक्रोळी पोलीस ठाण्यात कार्यरत असलेल्या उपनिरीक्षकाने, आपल्या बालपणीच्या मित्राच्या पत्नीवर बलात्कार केल्याची गंभीर घटना उघडकीस आली आहे.

पाहुयात हे प्रकरण नेमकं काय आहे..

VIDEO;DEEPAK ANKURKAR NAGPUR NEWS: मुंबईतील पोलीस उपनिरीक्षकाचा मित्राच्या पत्नीवर अतिप्रसंग
पीडित महिलेचा पती आणि आरोपी दीपक अंकुरकर यांची मैत्री 2009- 10 पासून खूप घट्ट होती.

दोघेही गडचिरोली पोलीस दलात शिपाई म्हणून एकत्र कार्यरत होते. 2017 साली दीपकने विभागीय परीक्षेत यश मिळवून उपनिरीक्षक पद मिळवले.

जानेवारी 2025 मध्ये दीपकने एक व्हॉट्सअॅप ग्रुप तयार करून कुटुंबांसमवेत गोव्याला सहलीला जाण्याचे नियोजन केलं..

EXCISE DUTY ACTION ILLIGAL ALCOHOL: गोव्यातून तस्करीसाठी आणलेला अवैध मद्यसाठा पुण्यात जप्त

ज्यात पीडित महिला आणि तिचे कुटुंबही सहभागी झाले होतं. याच सहलीदरम्यान दीपकने महिलेसोबत असभ्य वर्तन करायला सुरुवात केली.

15 फेब्रुवारी 2025 रोजी दीपक आणि त्याचे काही मित्र त्यांच्या कुटुंबांसह नागपूरजवळील वाघविला रिसॉर्टमध्ये गेले होते. त्यावेळी पीडित महिला एका खोलीत एकटी असताना, आरोपी दीपक त्या खोलीत शिरला

आणि त्याने महिलेवर जबरदस्तीने बलात्कार केला, असा गंभीर आरोप पीडित महिलेने केला.या घटनेनंतरही तो महिलेला वारंवार शरीरसुखाची मागणी करत धमकी देत होता.

या सर्व प्रकारानंतर 33 वर्षीय पीडित महिलेने हिंमत करून घडलेली आपबिती आपल्या पतीला सांगितली..

त्यानंतर पीडित महिला आणि तिच्या पतीने मिळून कोंढाळी पोलीस ठाण्यात आरोपीविरोधात तक्रार दाखल केली.

या तक्रारीवरून मुंबईतील विक्रोळी पोलीस ठाण्यात कार्यरत असलेल्या

उपनिरीक्षक दीपक नीलकंठराव अंकुरकर यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस आरोपीचा कसून शोध घेत आहेत.

 

Share This News
error: Content is protected !!