उत्तर प्रदेशातील बलरामपूर जिल्ह्यात धर्मांतर रॅकेट चालवणाऱ्या छांगूर बाबा (CHHANGUR BABA) च्या चौकशीत अनेक धक्कादायक खुलासे होतं आहेत. आता छांगूर बाबावर त्याच्या घरातील नोकर संचित याने देखील गंभीर आरोप केले आहेत.. भारत-नेपाळ सीमेपासून अवघ्या 30 किलोमीटर अंतरावर असलेल्या उत्तरौला शहरात वर्षानुवर्षे धर्मांतराचे नेटवर्क चालवणारा छांगूर बाबा यांच्यावर आता त्याच्या घरातील नोकर संचित यांनी धर्म बदलण्यासाठी दबाव आणल्याचा आरोप केला. संचितने छांगुर बाबाच्या हवेलीत सहा महिने काम केलं.‘इस्लाम धर्म स्वीकारण्यासाठी बाबाने 5 लाख रुपयांची रोख रक्कम, एक घर आणि दुचाकी देण्याचं वचन दिलं होतं. सनातन धर्माचा त्याग करून इस्लाम स्वीकारावा अशी बाबाची इच्छा होती…’ पण जेव्हा संचित याने नकार दिल्यानंतर त्याला धमकावण्यास सुरुवात झाली. बाबांच्या धर्मांतर रॅकेटमुळे त्रस्त झालेल्या संचितने कंत्राटदार वासिद्दीन उर्फ बब्बूकडेही याबद्दल तक्रार केली होती.पीडित संचितने बलरामपूर पोलिस स्टेशन, क्षेत्र अधिकारी आणि एसपी यांच्याकडे बाबाबद्दल तक्रार केली, परंतु कोणतीही कारवाई झाली नाही. बाबाच्या प्रभावामुळे आणि पैशांमुळे कोणीही त्याच्या तक्रारी गांभीर्याने घेतलं नाही. जेव्हा संचितने धर्मांतर करण्यास नकार दिला आणि नोकरी सोडली, तेव्हा बाबाने त्याचं जीवन आणखी खडतर केलं. बाबाच्या सांगण्यावरून, त्याच्या गावातील गुंडांनी संचित आणि पत्नीला खोट्या प्रकरणात अडकवून तुरुंगात पाठवले. असं आरोप संचित याने छांगूर बाबा याच्यावर केला संचित याची पत्नी जवळपास 24 दिवस तुरुंगात होती. संचित आज देखील न्यायासाठी लढत आहे. पण त्याला अद्याप कोणताच दिलासा मिळालेला नाही. आता छांगुर बाबाच्या चौकशीतून अजून कोणती धक्कादायक माहिती पुढे येते हे पाहणं आता महत्त्वाचं असणार आहे