पोलीस तुमचे रक्षण करतात, मग पोलिसांच्या मदतीला जाणे तुमचे कर्तव्य नव्हे का ? पाहा व्हिडिओ

452 0

मुंबई – संपूर्ण देशात उष्णतेने उच्चांकी पातळी गाठली आहे. दुपारच्यावेळी कुणीच महत्वाच्या कामाव्यतिरिक्त बाहेर पडताना दिसत नाही. अशा वेळी ऑन ड्युटी २४ तास असणाऱ्या पोलिसांना या उन्हात देखील आपले कर्तव्य बजावावे लागत आहे. मग अशा कडक उन्हात काम करणाऱ्या पोलिसांच्या मदतीला तुम्ही जायलाच हवे. सध्या असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

उन्हाचा त्रास झाल्याने ट्रॅफिक पोलीस बेशुद्ध पडतो. आजूबाजूने काही गाड्या जातात मात्र त्याची मदत करायला काही मिनिटं कोणीच येत नाही. एक महिला आपल्या मुलीसोबत स्कुटीवरून जात असताना तिचे लक्ष या बेशुद्ध असलेल्या ट्रॅफिक पोलिसाकडे जाते. ती या ट्रॅफिक पोलिसाची मदत करते. त्याला शुद्धीवर आणण्यात तिला यश येते.

हा व्हिडीओ जितेंद्र यादव नावाच्या युजरने सोशल मीडियावर शेअर केला. 5 हजारहून अधिक लोकांनी हा व्हिडीओ शेअर केला.

Share This News
error: Content is protected !!