NASHIK JUVENILE: नाशिक(NASHIK) शहरातील उंटवाडी भागात असलेल्या बाल निरीक्षण गृहातून एका अल्पवयीन मुलीच्या गायब होण्याची धक्कादायक घटना घडली.
15 दिवस उलटले तरी मुलीचा थांगपत्ता लागलेला नाही, आणि या प्रकरणात आता तिच्या पालकांनी ‘मुलीची विक्री’ केल्याचा
थेट आरोप निरीक्षण गृहातील कर्मचाऱ्यांवर केल्यामुळे एकच खळबळ उडाली..
RADHIKA YADAV CASE : टेनिसपटू मुलीची बापानेच केली गोळ्या झाडून हत्या? काय आहे कारण?
नाशिक शहरातील उंटवाडी परिसरात असलेल्या बाल निरीक्षण गृहातील एक अल्पवयीन मुलगी गेल्या 15 दिवसांपासून बेपत्ता असल्याने खळबळ उडाली आहे..
सिन्नर (SINNAR) तालुक्यातील वावी पोलीस ठाण्याच्या हद्दीत राहणारी अल्पवयीन मुलगी 22 मे रोजी कोणालाही न सांगता घरातून निघून गेली होती.
Junner Crime News : जुन्नर मधील रिव्हर्स वॉटरफॉल जवळील दरीत आढळले मृतदेह
NASHIK JUVENILE यानंतर वावी पोलीस ठाण्यात तिच्या बेपत्ताबाबत तक्रार दाखल करण्यात आली.
काही दिवसांतच ही मुलगी पुणे जिल्ह्यात सापडली. तिच्यासोबत असणाऱ्या तरुणावर बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायदा अर्थात पॉक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करून त्याची रवानगी मध्यवर्ती कारागृहात करण्यात आली.
तर, पीडित मुलीला पुढील प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत एक महिन्यासाठी नाशिकमधील उंटवाडी येथील बाल निरीक्षण गृहात ठेवण्यात आलं.मात्र, आता 15 दिवस झाले तरी संबंधित मुलगी निरीक्षण गृहातून गायब आहे.
अधिक धक्कादायक बाब म्हणजे, बाल निरीक्षण गृहामध्ये सीसीटीव्ही असूनही मुलगी कशी बाहेर गेली, याचा ठोस पुरावा पोलिसांना मिळालेला नाही.
या घटनेने हतबल झालेल्या मुलीच्या पालकांनी थेट बाल निरीक्षण गृहावरच गंभीर आरोप केले.
निरीक्षण गृहात मुलींवर लक्ष ठेवण्यासाठी कर्मचारी असताना देखील मुलगी बाहेर कशी गेली? 15 दिवसापासून मुलीचा शोध का लागला नाही? असा सवाल मुलीच्या पालकांकडून उपस्थित केला जातोय..
बाल निरीक्षण गृहातील लोकांनी मुलीची विक्री केल्याचा गंभीर आरोप देखील मुलीच्या पालकांनी केला आहे.
तर दोन दिवसात तपास लागला नाही तर निरीक्षण गृहाच्या गेटवर आत्मदहन करण्याचा इशारा मुलीच्या पालकांनी दिला.