DAUND YAWAT TRISHUL CASE: नवऱ्याला मारण्यासाठी फेकलेला त्रिशूल थेट 11 महिन्यांच्या बाळाला लागल्याने त्याचा मृत्यू झालाय.
ही हृदयद्रावक घटना दौंड (daund) मधील कडेगाव (kadegaon) भागात घडली.
प्रथमदर्शनी हा अपघात वाटत असला तरी यामध्ये अंधश्रद्धेच्या अँगलने हे तपास केला जात आहे.
पत्नी आणि तिच्या मित्राच्या त्रासाला कंटाळून पतीने स्वतःला संपवलं
दौंड तालुक्यातील (DAUND YAWAT TRISHUL CASE) कडेगावच्या आंबेगाव पुनर्वसन भागात ही धक्कादायक घटना घडली.
नितीन मेंगवडे यांचे पत्नी पल्लवी हिच्याशी वाद सुरू होते.
हे वाद टोकाला गेल्यानं सचिन यांची भावजय भाग्यश्री ही त्यांच्या अकरा महिन्यांच्या मुलाला कडेवर घेऊन भांडण सोडवण्यासाठी गेली.
त्यावेळी पल्लवीने रागाच्या भरात नितीन यांच्या दिशेने त्रिशूल फेकला.
मात्र नितीनने त्रिशूल चुकवल्याने तो थेट आईच्या कडेवर असलेल्या चिमुकल्याच्या डोक्यात लागला.
प्रचंड रक्तस्त्राव होऊ लागल्याने या चिमुकल्याला लगेचच रुग्णालयात दाखल करण्यात आलं.
मात्र उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. अवधूत मेंगवडे, असं या बाळाचं नाव आहे.
दरम्यान या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली.
त्यावेळी ज्या त्रिशूलने अवधूत जखमी झाला त्यात त्रिशूल वरील रक्त आणि जमिनीवर पडलेला रक्त पुसून ठेवलेलं होतं.
पुरावे नष्ट करण्यासाठी हे प्रयत्न केल्याचा अंदाज पोलिसांना आहे.
त्यामुळेच पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला असून यामध्ये अंधश्रद्धेचा काही प्रकार आहे का याचाही तपास सुरू आहे.