Unsafe Bridges In Pune : पुणे जिल्ह्यातील 61 पूल होणार जमीनदोस्त ! जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश

132 0

Unsafe Bridges In Pune : पुण्यातील कुंडमळा येथील इंद्रायणी नदीवरून पूल कोसळण्याच्या घटनेच्या पार्श्वभूमीवर पुणे जिल्ह्यातील 61 धोकादायक पूल तात्काळ पाडण्याचे आदेश
जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी दिले आहेत.

डीजे लावणाऱ्या गणेश मंडळांना मदत नाही

कुंडमळा येथील दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर विविध यंत्रणांकडून जिल्हाधिकार्‍यांनी मागविलेल्या अहवालानुसार, जिल्ह्यात 61 पूल धोकादायक आहेत. हे पूल तात्काळ पाडण्याचे आदेश जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी जिल्हा परिषद, सार्वजनिक बांधकाम विभागाला दिले आहेत. येत्या 2-3 महिन्यांत ही कार्यवाही पूर्ण करण्यात येईल, असंही त्यांनी स्पष्ट केलय. दरम्यान, या पुलांच्या (Unsafe Bridges In Pune) ठिकाणी धोकादायक पूल म्हणून फलक लावले असून, नागरिकांनी पर्यायी मार्गाचा वापर करावा, असे आवाहन देखील जिल्हाधिकार्‍यांनी केले आहे.

*TOP NEWS MARATHI : विधानसभेला विरोधी पक्ष नेता मिळालाच पाहिजे, आमदार ज्योती गायकवाड यांची मागणी

यामध्ये जिल्हा परिषदेच्या अंतर्गत येणारे 58 पूल धोकादायक स्थितीत असल्याचे आढळून आले आहेत. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या हद्दीतील तीन पूल धोकादायक स्थितीत (Unsafe Bridges In Pune) असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाला दिली आहे. सोमवारी याबाबत एक बैठक घेण्यात आली या बैठकीमध्ये जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी हे धोकादायक पूल पाडण्याचे स्पष्ट आदेश दिले आहेत. जिल्हा परिषदेच्या दक्षिण आणि उत्तर या दोन विभागांतील मोरी, पूल आणि लहान पूल याची संख्या 5 हजार 518 इतकी आहे. यातील 58 पूल धोकादायक आहेत.सार्वजनिक बांधकाम विभागातील पूर्व, दक्षिण, उत्तर आणि प्रकल्पांमध्ये 794 पूल आहेत. त्यातील 3 पूल धोकादायक आहेत. तर राज्य परिवहन महामंडळाच्या अखत्यारीत असलेली 24 जाहिरात फलके सुस्थितीत असल्याचा अहवाल महामंडळाने दिला आहे. शिवाय PMRDA कडून सर्व बांधकामे सुस्थितीत असल्याचा अहवाल जिल्हा प्रशानाला प्राप्त झाला आहे.

कुंडमळा येथील पूल नव्याने बांधण्यात येणार असून, हे काम सार्वजनिक बांधकाम विभागाकडून करण्यात येणार आहे. याबाबतची वर्क ऑर्डरही देण्यात आली आहे. अशी माहिती जिल्हाधिकाऱ्यांनी दिली आहे.

Share This News
error: Content is protected !!