BEED NEWS : राजकारण असो किंवा गुन्हेगारी कोणत्या न कोणत्या कारणाने बीड जिल्हा सध्या राज्यात चर्चेत आहे.. बीडमधील घटनांनी मराठवाड्यातच नाही तर संपूर्ण महाराष्ट्राला (BEED NEWS) हादरवून सोडलं.. बीडमधील चेतना कळसे प्रकरणापासून ते संतोष देशमुख हत्या प्रकरणापर्यंतचा हादरवणारा टॉप न्यूज मराठीचा हा स्पेशल रिपोर्ट..
CHANDRAKANTA PATIL: पुणे पोलीस दलात लवकरच एक हजार पोलीस कर्मचारी
बीड जिल्ह्यातील केज तालुक्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांची 9 डिसेंबर 2024 रोजी अत्यंत अमानुषपणे त्यांची हत्या करण्यात आली.. त्यानंतर माजी मंत्री धनंजय मुंडे यांचे निकटवर्तीय असलेले वाल्मीक कराड याच्यासह त्याच्या गँगवर मकोका अंतर्गत कारवाई करत त्यांच्यावर संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा आरोप ठेवण्यात आला.. ज्या प्रकरणाचा वाढता रोष लक्षात घेऊन धनंजय मुंडेंना त्यांच्या मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला.. परंतु या घटनेने बीडमधील खुनाच्या प्रकरणाची जुनी प्रकरणं आता ताजी झाली आहेत..परळीतील पहिलं गाजलेले हत्याकांड जवळपास 30 वर्षांपूर्वी घडलं. 1997-98 मध्ये परळीतील एका कला शिक्षकाची तरुण मुलगी जळून मरते आणि तिच्या मृत्यूनंतर तिचे वडीलही गळफास घेवून स्वतःचं आयुष्य संपवतात ? पुढे या मुलीच्या आणि तिच्या वडिलांच्या मृत्यूनंतर या कुटुंबाची वाताहत होते पण या तरुणी सोबत नेमकं काय घडलं? हे कधीही बाहेर आलं नाही.2001 मध्ये परळी येथे संगीत दिघोळे नावाच्या राजकीय कार्यकर्त्याचा भरदिवसा परळी कोर्टासमोर खून झाला.. जवळपास शंभर लोक उघड्या डोळ्यांनी हत्या पाहतात. पण दहशतीमुळे साक्ष द्यायला (BEED NEWS) एकही पुढे येत नाही. आरोपी पुराव्याअभावी निर्दोष सूटतात. पुढे 2008 मध्येच संगीत दिघोळे यांच्या हत्येचा आरोपी असलेला किशोर फड याची हत्या होते. आरोपी पुराव्यां अभावी निर्दोष मुक्त होतात. 2015 मध्ये पुन्हा आधीच्या हत्येतील आरोपी काकासाहेब गर्जेची हत्या होते. त्याप्रकरणाचाही पुढे काहीही सोक्षमोक्ष लागत नाही.
संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर आता चेतना कळसेला न्याय मिळेल का? असा सवाल विचारण्यात येत आहे. भाजपा नेते सुरेश धसांनी गेल्यावर्षी झालेल्या महादेव मुंडेंच्या हत्येच्या प्रकरणातही गौप्यस्फोट केला होता. 22 ऑक्टोबर 2023 ला परळीत दुधाचा व्यवसाय करणाऱ्या महादेव मुंडेंची हत्या झाली. त्यात वाल्मिक कराडच्या मुलासोबत फिरणाऱ्या अनेक आरोपींना अभय दिला गेल्याचा आरोप सुरेश धसांनी केला होता. परळीमधील हत्येची मालिका ही प्रामुख्याने 2001 पासून संगीत दिघोळे यांच्या हत्येने सुरू झाली असे येथील जाणकार सांगतात.. सर्वांवर दहशत माजवणारा दिघोळे हा टी पी मुंडेंचा कट्टर समर्थक होता..2001 ला मुंडे समर्थक किशोर फडसह इतरांवर दिघोळेच्या हत्येचा आरोप झाला. दिघोळेसारख्या दहशत पसरवणाऱ्या व्यक्तीच्या हत्येशी नाव जोडलं गेल्यानं किशोर फडचंही प्रस्थ वाढलं. फडच्याही राजकीय आकांशा मोठ्या होवू लागल्या. त्याच महत्वाकांक्षेपायी त्यानंही राष्ट्रवादीत प्रवेश केला. पण 2008 ला किशोर फडचीही धारधार शस्रानं हत्या झाली. या प्रकरणात मुंडे समर्थक काकासाहेब गर्जे आणि बबन गीत्ते आरोपी झाले.नंतर 2015 ला काकासाहेब गर्जे यांचीही हत्या झाली. पुढे यातले दुसरे आरोपी बबन गीत्ते 2024 ला धनंजय मुंडेंविरोधात शरद पवारांच्या राष्ट्रवादीत आले. कधी काळचे कट्टर मुंडे समर्थक राजकीय वादातून कट्टर विरोधक बनले. यंदाच्या विधानसभेला बबन गित्ते धनंजय मुंडेंविरोधात उमेदवार असण्याची चर्चा होती, मात्र त्याआधी सरपंच बापू आंधळे हत्येत बबन गीत्तेचं नाव आलं. आणि ते फरार झाले. परंतु आता संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणामुळे बीड मधील जुन्या प्रकरणांचाही तपास होतो का ?हे पाहण्यात महत्त्वाचा असणार आहे.
*TOP NEWS MARATHI : पुणे हादरलं! प्रेम विवाह केला म्हणून तरुणावर कोयत्याने हल्ला
बीडमध्ये खुनाची मालिका 1997 पासून सुरू आहे.. बीडमध्ये घडलेल्या खुनाच्या घटनांवर कुणीही जाहीरपणे बोलायला तयार होत नाही..कुणाचं नाव घेऊन किंवा आरोप करुन बोलणं तर दूरच. पण साधं घडलं काय होतं हे सुद्धा बोलण्यास जुने-जाणते लोक फारसे धजावत नाहीत. “चेतना कळसे असो, संगीत दिघोळे असो, महादेव मुंडे असो की बापू आंधळे की आता संतोष देशमुख असो हत्येचं स्वरूप तेच, फक्त नावं बदलतात. पुरावे गायब होतात, साक्षीदार गप्प बसतात आणि आरोपी वर्षानुवर्षं मोकळेच फिरतात. बीडमध्ये घडलेल्या या काळ्या गुन्ह्याची खुनाच्या मालिकांची चौकशी होईल का? की संतोष देशमुख प्रकरणही इतर प्रकरणाप्रमाणेच गाडून टाकलं जाईल का? हे पाहणे आता महत्त्वाचं असणार आहे.