WALMIK KARAD: बीड जिल्ह्यातील सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी वाल्मिक कराड याला तुरुंगातच संपवण्याचा कट रचला जात असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. तुरुंग प्रशासन आणि पोलिस यंत्रणा आता सतर्क झाली आहे.

WALMIK KARAD: वाल्मीक कराडचा तुरुंगातच कोण करणार गेम?.. रातोरात वाल्मीकला नाशिक कारागृहात हलवण्यात येणार?

2643 0

WALMIK KARAD: बीड जिल्ह्यातील सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी वाल्मिक कराड याला तुरुंगातच संपवण्याचा कट रचला जात असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.

तुरुंग प्रशासन आणि पोलिस यंत्रणा आता सतर्क झाली आहे.

वाल्मिक कराड सध्या बीडच्या जिल्हा कारागृहात असून, त्याच्या जीवाला धोका असल्याचं समजताच आता त्याची रवानगी थेट नाशिकच्या कारागृहात केली जाण्याची शक्यता आहे.

Walmik Karad ला वाचवण्यासाठी वकिलांचा आटापिटा!तो ‘अण्णा’ वाल्मीक नव्हेच!
गेल्या अनेक महिन्यांपासून बीड जिल्हा हा वेगवेगळ्या कारणांमुळे राज्यात चर्चेच्या केंद्रस्थानी आहे.

मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरण आणि या प्रकरणातील मुख्य आरोपी वाल्मिक कराड पुन्हा एकदा चर्चेत आलं.

संतोष देशमुख हत्या प्रकरणात मुख्य आरोपी असलेला वाल्मिक कराड सध्या बीडच्या जिल्हा कारागृहात आहे. मात्र या तुरुंगात काही संशयास्पद हालचाली आढळल्या होत्या.

ही बाब लक्षात येताच तुरुंग प्रशासन आणि पोलीस दलात मोठ्या हालचाली वाढल्या आहेत. लवकरच कराड याला बीडच्या जिल्हा कारागृहातून थेट नाशिकच्या तुरुगांत पाठवलं जाणार आहे.

कराडच्या जीवितास धोका असल्याची बाब लक्षात घेऊनच हा निर्णय घेण्यात आला आहे.

काही दिवसांपूर्वीआरोपी वालिमीक कराडला बीडच्या जिल्हा कारागृहाऐवजी दुसऱ्या कारागृहात पाठवण्यात यावं अशी मागणी सामाजिक कार्यकर्त्यांसह देशमुख कुटुंबियांनी केली होती.

बीडच्या जिल्हा कारागृहात गिते गँग आणि कराड गँगगमध्ये काही दिवसांपूर्वी वाद झाला होता.

विशेष संपादकीय! Walmik Karad चा 57 वा वाढदिवस! ‘तो’ मात्र बिन भाड्याच्या खोलीत!

या सर्व बाबी लक्षात घेऊनच कराडला आता नाशिकच्या तुरुंगात हलवण्यात येणार आहे.

संतोष देशमुख हत्या प्रकरणातील मुख्य सूत्रधार वाल्मिक कराड

सुदर्शन घुले, प्रतीक घुले, जयराम चाटे, सुधीर सांगळे आणि महेश केदार हे

आरोपी बीडच्या जिल्हा करागृहात आहेत.त्यापैकी वालिमीक कराडला आता नाशिकच्या जिल्हा कारागृहात हलवण्यात येणार असल्याची माहिती समोर आली.

वाल्मिक कराडने आतापर्यंत फक्त एकदाच जामीनासाठी अर्ज केला होता — 14 जानेवारी 2025 रोजी न्यायालयीन कोठडी मिळाल्यानंतर

त्याच दिवशी त्याच्या वकिलांनी खंडणी प्रकरणात जामीन अर्ज दाखल केला होता..मात्र, नियोजित सुनावणींपूर्वीच हा अर्ज मागे घेतला गेला.

कराडविरोधात आता एक जुनी ऑडिओ क्लिप आणि पंचतारांकित हॉटेलमधील फोटो व्हायरल झालेत.

ऑडिओमध्ये तो एका दलित कुटुंबावर अपमानास्पद भाषेत बोलताना ऐकायला मिळतोय. विजयसिंह बांगर यांनी ही माहिती समोर आणली असून,

त्यांनी कराडला “सायको” ठरवत अनेक गंभीर आरोप केले आहेत. आता संतोष देशमुख हत्या प्रकरणाची पुढील सुनावणी ही सात जुलैला होणार आहे..

आवादा कंपनीला दोन कोटी रुपयांची खंडणी मागितल्या प्रकरणी आणि संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणी

वाल्मीक कराडावर गुन्हे दाखल करण्यात आले असून.. वाल्मीक कराड सध्या बीडच्या कारागृहात आहे वाल्मीक कराड याची गॅंग आणि बबन गीते यांच्या गॅंगमध्ये पूर्वीच वैमनश्य

असल्यामुळे बीड कारागृहात वाल्मीक कराच्या जीवितास धोका उत्पन्न होऊ शकतो.

त्यामुळे लवकरच वाल्मीक कराड याला नाशिकच्या कारागृहामध्ये हलवले जाण्याची शक्यता आहे.

Share This News
error: Content is protected !!