CHANDANNAGAR TEACHER CASE: अनेक शाळा, महाविद्यालय आणि खाजगी क्लासेसमध्ये विद्यार्थ्यांवर लैंगिक अत्याचारांच्या घटना समोर येत आहे. यातच भर म्हणजे आता शाळेतील एका शिक्षकाने चक्क 'तुझं कुणाशी लफडं आहे का ?', असा प्रश्न आठवीच्या विद्यार्थिनीला विचारलाय.

CHANDANNAGAR TEACHER CASE: ‘तुझं लफडं आहे का?” पुण्यातील शाळेतील शिक्षकाचा विद्यार्थिनीला अश्लील सवाल

305 0

CHANDANNAGAR TEACHER CASE: अनेक शाळा, महाविद्यालय आणि खाजगी क्लासेसमध्ये विद्यार्थ्यांवर लैंगिक अत्याचारांच्या घटना समोर येत आहे.

यातच भर म्हणजे आता शाळेतील एका शिक्षकाने चक्क ‘तुझं कुणाशी लफडं आहे का ?’,

असा प्रश्न आठवीच्या विद्यार्थिनीला विचारलाय.

एवढेच नाही तर वर्गातील मुलांना मुलींना प्रपोज कसं करायचं हे सुद्धा शिकवलं.

आश्चर्याची गोष्ट म्हणजे घटना शिक्षणाचं माहेरघर असलेल्या पुणे शहरात घडली आहे.

PUNE STUDENT VIRAL VIDEO: विद्यार्थ्यांच्या टोळक्याची एकाला मारहाण; लष्कर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
घरानंतर सगळ्यात जास्त वेळ मुलं ही शाळेत असतात (CHANDANNAGAR TEACHER CASE)

मात्र याच शाळेमध्ये मुलं अजिबातही सुरक्षित नाहीत.

शाळेतील शिक्षक आणि इतर कर्मचाऱ्यांकडून विद्यार्थ्यांवर अत्याचार केल्याच्या घटना ताज्या असताना पुण्यातील शाळेत अजब प्रकार घडला आहे.

‘प्रेम कसं करायचं ?, मुलींना प्रपोज कसं करायचं ? मुलींना कोणते गिफ्ट दिल्यावर मुली पटतात ?

Junner Crime News : जुन्नर मधील रिव्हर्स वॉटरफॉल जवळील दरीत आढळले मृतदेह

याचं शिक्षण एका शिक्षकानं चक्क आठवीच्या विद्यार्थ्यांना दिलं. त्याचबरोबर या वर्गातील एका मुलीला उभं करून

‘तुझा कोणी बॉयफ्रेंड आहे का तुझं कोणाशी लफडं आहे का? असा प्रश्न विचारला.. या प्रकारानंतर मुलीच्या मनात लज्जा उत्पन्न झाली.

त्यामुळे मुलीने तिच्या कुटुंबीयांना या शिक्षकाबद्दल माहिती दिली. वर्गातील आणखी दोन मुलांनी देखील शिक्षकाचा हा पराक्रम सांगितला.

मिळालेल्या माहितीनुसार हा शिक्षक शाळेत “मंगेश भाऊ” या नावाने ओळखला जातो.

त्याच्याच विरोधात आज चंदननगर पोलीस ठाण्यात मुलीच्या कुटुंबीयांकडून तक्रार दाखल करण्यात आली.

MUMBAI DADAR CASE: 40 वर्षीय शिक्षिकेकडून 11 वीत शिकणाऱ्या विद्यार्थ्यावर लैंगिक अत्याचार
पीडित विद्यार्थिनी ही अवघ्या आठवीत शिकत आहे. अशा वयात शिक्षकानचं विचारलेल्या या प्रश्नांमुळे विद्यार्थिनीचा थरकाप उडाला

. तिने हिम्मत दाखवत हे सगळं घरी सांगितल्यामुळे आता या शिक्षकाविरोधात गुन्हा दाखल झालाय. मात्र जे पालक शिक्षकांवर विश्वास ठेवून आपली मुलं त्यांच्याकडे शिकायला पाठवतात

तेच जर मुलांना मुली कशा पटवायच्या हेच शिकवणार असतील तर या शिक्षकांना मुलांचं भविष्य घडवायचं आहे की बिघडवायचंय, असा सवाल उपस्थित होत आहे.

त्याचबरोबर जो शिक्षक विद्यार्थ्यांना असे प्रश्न विचारत असेल तो विद्यार्थ्यांशी गैरवर्तन नाही करत असेल किंवा इतर विद्यार्थ्यांना गैरवर्तन करण्याला पाठबळ देतोय का ?

हा प्रश्न पालकांनाही पडला असून पोलिसांकडून याचा तपास केला जातोय.

Share This News
error: Content is protected !!