MUMBAI DADAR CASE:  मुंबईतील एका घटनेने सं संपूर्ण शिक्षण क्षेत्राला आणि पालकांना हादरवून सोडलंय. मुंबईतील (MUMBAI DADAR CASE) एका प्रतिष्ठित शाळेतील एका महिला शिक्षिकेला अल्पवयीन विद्यार्थ्यावर लैंगिक अत्याचार केल्याच्या आरोपाखाली अटक करण्यात आली असून या घटनेनं एकच खळबळ उडाली..

MUMBAI DADAR CASE: 40 वर्षीय शिक्षिकेकडून 11 वीत शिकणाऱ्या विद्यार्थ्यावर लैंगिक अत्याचार

365 0

MUMBAI DADAR CASE:  मुंबईतील एका घटनेने सं संपूर्ण शिक्षण क्षेत्राला आणि पालकांना हादरवून सोडलंय.

मुंबईतील (MUMBAI DADAR CASE) एका प्रतिष्ठित शाळेतील एका महिला शिक्षिकेला अल्पवयीन विद्यार्थ्यावर लैंगिक अत्याचार

केल्याच्या आरोपाखाली अटक करण्यात आली असून या घटनेनं एकच खळबळ उडाली..

पंढरपूरला निघालेल्या तरूणीवर दौंड जवळ अतिप्रसंग; 24 तास होऊनही आरोपी मोकाट
मुंबईतील दादर पोलिसांनी देशातील अव्वल पाच शाळांपैकी एक असलेल्या

मुंबईतील एका नामांकित शाळेतील ४० वर्षीय महिला शिक्षिकेला अल्पवयीन विद्यार्थ्यावर लैंगिक अत्याचार केल्याच्या आरोपाखाली अटक केली आहे.

दादर पोलिसांनी या शिक्षिकेविरुद्ध पोक्सो कायदा, बाल न्याय कायदा आणि भारतीय दंड संहितेच्या गंभीर कलमांखाली गुन्हाही नोंदवला आहे.

पोलिसांच्या माहितीनुसार, हा लैंगिक अत्याचार गेल्या एक वर्षापेक्षा जास्त काळापासून सुरू होता.

FALTAN WARI INCIDENT: विजेचा शॉक लागून दोन वारकऱ्यांचा मृत्यू, विठुरायाच्या भेटी आधी काळानं गाठलं

या काळात, आरोपी शिक्षिकेने विद्यार्थ्याला दक्षिण मुंबईतील अनेक पंचतारांकित हॉटेल्समध्ये आणि विमानतळाजवळील लॉजमध्ये नेऊन त्याचे लैंगिक शोषण केले.

धक्कादायक बाब म्हणजे, विद्यार्थ्याने गप्प राहावे, यासाठी ती त्याला नैराश्यविरोधी औषधंही देत होती. पीडित विद्यार्थी अकरावीमध्ये शिक्षण घेत होता.
हे शोषण सुरू झाल्यानंतर काही महिन्यांनी, विद्यार्थ्याच्या वागण्यात बदल दिसून येऊ लागले.

पालकांनी त्याच्याशी संवाद साधला असता, त्याने घडलेल्या सर्व अत्याचारांची माहिती दिली

PRASAD DADA TAMKAR PUNE SCAM:भक्तांच्या खासगी क्षणांवर ‘डोळा’ ठेवणारा भोंदूबाबा !; सापडला तावडीत; घातला कोठडीत!

मात्र, विद्यार्थ्याचे शालेय शिक्षण पूर्ण होण्यासाठी काही महिनेच उरले असल्यामुळे कुटुंबीयांनी त्या वेळी गुप्तता बाळगण्याचा निर्णय घेतला.

त्यांना आशा होती की, शिक्षिका त्याला सोडून देईल. परीक्षा संपल्यानंतर, आरोपी शिक्षिकेने आपल्या नोकराला विद्यार्थ्याला भेटण्यासाठी पाठवले.

याच वेळी विद्यार्थ्याने आपल्या पालकांना या भयंकर अनुभवाची माहिती दिली.

त्यानंतर कुटुंबीयांनी तातडीने पोलिसांकडे तक्रार नोंदवली आणि पोलिसांनी त्वरित कारवाई करत शिक्षिकेला अटक केली.

या शिक्षिकेच्या अटकेनंतर, देशातील एक प्रतिष्ठित शाळा आणि तिचे काही प्रसिद्ध माजी विद्यार्थी यांच्या प्रतिमेला मोठा धक्का बसला आहे.

पोलिसांनी शिक्षिकेच्या मोबाइलमधील चॅट्स, हॉटेल बुकिंग्ज आणि इतर डिजिटल पुरावे ताब्यात घेतले आहेत

. या प्रकरणी अधिक तपशीलवार चौकशी सुरू असून शिक्षिकेवर कठोर कारवाई होण्याची शक्यता आहे.

या घटनेने विद्यार्थ्यांच्या सुरक्षेबाबत गंभीर प्रश्न आता उपस्थित झाला असून शैक्षणिक संस्थांमध्ये, जिथे विद्यार्थी सुरक्षित असतील अशी अपेक्षा असते,

तिथेच शिक्षकांकडून अशा प्रकारे विद्यार्थ्यांवरील अत्याचाराच्या घटनेने शाळा आणि पालक दोघांनाही मोठा धक्का बसला आहे.

प्रकरणात कठोर कारवाई होऊन विद्यार्थ्याला न्याय मिळतो का हे पाहण आता महत्त्वाचे असणार आहे..

Share This News
error: Content is protected !!