SAI BABA PALKHI 2025 : साई बाबांच्या पुणे ते शिर्डी पालखी सोहळ्याला उत्साहात सुरुवात

175 0

SAI BABA PALKHI 2025 : श्रद्धा आणि सबुरीची परंपरा जोपासत आजपासून श्री साईबाबा पालखी सोहळ्याला पुण्यातून भव्य सुरुवात झाली. यंदाचा पालखी सोहळा विशेष आहे, कारण हे आहे या भक्तिमय प्रवासाचं 37 वं वर्ष आहे… पुणे ते शिर्डी असा पायी पालखी सोहळा असणार आहे..

हिंदी भाषा संदर्भातील जीआर मागे; ठाकरे बंधूंचा मोर्चा रद्द

श्री साईबाबा पालखी सोहळा समिती पुणेच्या वतीने पुणे ते श्री क्षेत्र शिर्डी असा पायी पालखी सोहळा आजपासून सुरू झाला आहे. या सोहळ्याचं हे 37वं वर्ष आहे.आज सकाळी शिवाजीनगर येथील (SAI BABA PALKHI 2025 ) श्री साई मंदिरात पहाटे 6 वाजता सौ. शेता आणि श्री शिवम वीर यांच्या हस्ते श्री साईंच्या पावन पादुकांचं मंगल स्नान आणि अभिषेक करण्यात आला.

TOP NEWS MARATHI : इंदापूरमध्ये भक्तीचा महासागर; संत तुकाराम महाराज यांची पालखी नातेपुते, तर संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी बरड मुक्कामी

यानंतर पालखी कसबा गणपती मंदिरापासून विधिवत मार्गस्थ झाली. यावेळी केंद्रीय हवाई नागरी उड्डाण राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, आमदार हेमंत रासने, माजी (SAI BABA PALKHI 2025 ) नगरसेवक श्रीनाथ भीमाले, परमपूज्य योगाश्री शरद शास्त्री जोशी महाराज आणि समितीचे अध्यक्ष रमेश भोसले उपस्थित होते.37 वर्षांपूर्वी फक्त 50 भक्तांमधून सुरू झालेला (SAI BABA PALKHI 2025) हा पालखी सोहळा, यंदा 10 हजारहून अधिक साईभक्तांच्या सहभागानं भक्तिरसात न्हालेला आहे. पालखीचा मार्ग कसबा गणपतीपासून फडके हाऊस, दारूवाला पूल, रस्ते वाडा, 15 ऑगस्ट चौक, नरपदगिरी चौक, पोलीस स्टेशन, अलंकार टॉकीज मार्गे वाघोली मुक्कामी पोहोचणार आहे.पालखी 9 जुलैला गुरुपौर्णिमेच्या पूर्वसंध्येला शिर्डीत पोहोचणार आहे. पालखी मार्गावर साईभक्त व्यसनमुक्तीचा संदेश देत आहेत. भक्तीच्या जोडीला सामाजिक जाणीवेचंही दर्शन या प्रवासात घडतं आहे..

Share This News
error: Content is protected !!