ASHADHI WARI 2025: आषाढी एकादशी म्हणजे भक्ती, श्रध्दा आणि विठुरायाच्या चरणी लीन होण्याचा दिवस…
पंढरपुरात लाखो भाविकांच्या गर्दीमध्ये श्री विठ्ठल-रुक्मिणी मातेच्या दर्शनासाठी (ASHADHI WARI 2025) यंदा विशेष नियोजन करण्यात आलं आहे.
यंदा दर्शन व्यवस्था, सुरक्षा यामध्ये मोठे बदल करण्यात आले असून,
भाविकांना अधिक सुलभ दर्शन मिळावं यासाठी मंदिर समिती आणि प्रशासनाने संयुक्त नियोजन केलं.
TOP NEWS MARATHI: ASHADHI WARI 2025:विठ्ठल-रूक्मिणी मातेचं 24 तास मुखदर्शन सुरू
पंढरपूर… भीमा नदीच्या तीरावर वसलेलं भक्तीचं माहेरघर…
आणि आषाढी एकादशीच्या दिवशी इथं असतो भक्तांचा महासागर… ASHADHI WARI 2025
Wari Video : वारीत हरिनामाच्या गजरात महाराष्ट्र पोलीसही तल्लीन
यंदा श्री विठ्ठलाच्या दर्शनासाठी लाखो भाविकांची गर्दी लक्षात घेता मंदिर समितीनं विशेष नियोजन केलं आहे.
27 जूनपासूनच श्री विठ्ठलाचा पलंग काढण्यात आला असून, 24 तास मुखदर्शन आणि तब्बल 22 तास पदस्पर्श दर्शनाची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.
या काळात काकडा आरती, पोशाख, धूपारती, शेजारती यांसारखे राजोपचार बंद करण्यात आले असून, नित्यपूजा, गंधाक्षता आणि महानैवेद्य सुरू राहणार आहेत.
सर्वसामान्य वारकऱ्यांना सुलभ दर्शन मिळावं यासाठी व्हीआयपी, टोकन आणि ऑनलाईन बुकिंग पूर्णपणे बंद करण्यात आलं आहे. दर मिनिटाला 35 भाविकांना दर्शन मिळेल अशी यंत्रणा राबवण्यात येत आहे.
दर्शनानंतर भाविकांना मंदिर परिसरातून तुकाराम भवनमार्गे बाहेर जाण्याचं नियोजन असून, यासाठी बॅरिकेड्स लावण्यात आले आहेत.
वारी मार्गावर चोख सुरक्षा व्यवस्था राखण्यासाठी यंदा एआयचा वापर करण्यात येणार आहे. चेन स्नॅचिंग, गर्दी नियंत्रण आणि अनुचित प्रकार रोखण्यासाठी ड्रोन कॅमेऱ्यांची मदत घेतली जाणार आहे.
7 हजार पोलिसांचा टप्प्याटप्प्याने बंदोबस्त राहणार आहे.
बॉम्ब शोध पथक, SRPF आणि जनरेटरची व्यवस्था करण्यात आली आहे.
कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक सुनील फुलारी स्वतः पाहणी करत असून, नदीपात्रात होडी आणि बोटींसाठी सुरक्षेच्या कसोशीनं चाचण्या घेतल्या जात आहेत..
संत तुकाराम महाराज यांच्या पालखीचा मुक्काम आज माळशिरस येथे असणार आहे.. ही पालखी 5 जुलैला पंढरपुरात दाखल होणार आहे..
तर संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या पालखीचा आज मुक्काम फलटण येथे असणार आहे.. तर 5 जुलैला ही पालखी पंढरपुरात दाखल होणार आहे.
6 जुलैला आषाढी एकादशीच्या दिवशी पंढरपुरात वैष्णवांचा मेळा जमणार आहे ..