ठाकरे बंधूंचं ठरलं! हिंदीवरून जुळलं; हिंदी भाषा सक्तीविरोधात ठाकरे बंधूंचा एकत्रित मोर्चा

154 0

राज्यात हिंदी भाषा सक्ती विरोध करत अनेक भाषातज्ञ अभिनेते मैदानात उतरले असतानाच आता राजकीय वर्तुळातून एक महत्त्वाची बातमी समोर आली असून हिंदी भाषा सक्ती विरोधात ठाकरे बंधूंचा एकत्रित मोर्चा होणार आहे.

नुकतीच पत्रकार परिषद घेऊन राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्याकडून मोर्चाची घोषणा करण्यात आली होती. मनसेचा मोर्चा पाच जुलै रोजी तर ठाकरे गटाचा मोर्चा हा सात जुलै रोजी होणार होता मात्र आता हा मोर्चा एकत्रित होणार असल्याची घोषणा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार आणि मुख्य प्रवक्ते संजय राऊत यांनी केली आहे.

हिंदी भाषा शक्ती विरोधात एकच आणि एकत्रित मोर्चा म्हणत राज आणि उद्धव ठाकरेंचा एकत्रित फोटो ट्विट करत संजय राऊत यांनी ही घोषणा केली आहे.

Share This News
error: Content is protected !!