PUNE METRO : पुणे मेट्रोच्या दुसऱ्या टप्प्याला मंजुरी, कसा असेल नवा मार्ग?
PUNE METRO : पुणेकरांसाठी एक खुशखबर आहे. पुणेकरांना आता तासंतास रोड ट्रॅफिक मध्ये फसण्याची आवश्यकता नाही. कारण केंद्रीय मंत्रिमंडळ बैठकीमध्ये पुणे मेट्रोच्या दुसऱ्या टप्प्याला मंजुरी देण्यात आली आहे. याकरिता 3626 कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहेत. याचा फायदा नक्की पुण्यातल्या कोणत्या भागाला होणार आहे? कसा असेल हा विस्तार? कोणत्या स्थानकांचा असेल यामध्ये (PUNE METRO) समावेश? चला जाणून घेऊयात…
MEDHA KULKARNI BANNER : कोथरूडच्या बाई’ म्हणत मेधा कुलकर्णी विरोधात बॅनर लावणं ठाकरे गटाला भोवलं
मेट्रोचा हा दुसरा टप्पा वनाज रामवाडी या पहिल्या टप्प्याचे विस्तारीकरण असेल. त्यामध्ये वनाज ते चांदणी चौक ( कॉरिडोर 2 अ ) आणि रामवाडी ते वाघोली/ विठ्ठलवाडी ( कॉरिडोर 2 ब ) या विस्तारीत मार्गांचा समावेश असेल.
दोन्ही उन्नत मार्ग 12.75 किलोमीटर लांबीचे असून त्यामध्ये 13 मेट्रो स्थानकांचा समावेश असेल. या विस्तारीकरणाचा फायदा काय? तर यामुळे वेगाने विकसित होणारे बावधन, कोथरूड, खराडी आणि वाघोली ही उपनगरे मेट्रोसेवेशी जोडली जाणार आहेत. यामुळे पुण्यातील पूर्व पश्चिम सार्वजनिक वाहतूक मजबूत होणार आहेत.
या नव्या विस्तारित मार्गामध्ये एकूण 13 स्थानकांचा समावेश असेल. त्यापैकी कॉरिडोर 2-अ मध्ये म्हणजेच वनाज ते चांदणी चौक दरम्यान कोथरूड बस डेपो आणि चांदणी चौक ही दोन स्थानकं असतील. तर रामवाडी ते वाघोली (कॉरिडॉर 2- ब ) यादरम्यान विमान नगर,सोमनाथ नगर, खराडी बायपास, तुळजाभवानी, उबाळे नगर, अप्पर खराडी रोड, वाघेश्वर मंदिर, वाघोली, सिद्धार्थनगर, बकोरी फाटा आणि विठ्ठलवाडी अशी स्थानकं असतील.
कोणाला होणार नव्या मार्गाचा फायदा?
या नव्या मेट्रो मार्गाचा फायदा हा नगर रोड वरून प्रवास करणाऱ्या नागरिक प्रवासी आणि कामगार यांना होणार आहे. या दोन मार्गिकांमुळे आयटी हब, व्यावसायिक ठिकाण, शैक्षणिक संस्था आणि निवासी ठिकाण सुद्धा जोडली जाणार आहेत. मुख्य म्हणजे नगर रस्त्यावर सर्रास वाहतूक कोंडी होते. दररोजच इथं तासनतास ट्राफिक मध्ये ताटकळत प्रवाशांना थांबावं लागतं. मात्र हा मार्ग झाल्यानंतर इथल्या वाहतूक कोंडीचा प्रश्न सुटेल असं बोललं जातय.
सद्यस्थितीबद्दल सांगायचं झाल्यास सध्या 1.7 लाख प्रवासी दररोज मेट्रोनं प्रवास करतात. नव्या मार्गीके मुळे शहरातील नागरिकांना पूर्व पश्चिम भाग पिंपरी चिंचवड,हिंजवडी आयटी हब या मार्गावर प्रवास करणे सोयीचं होणार आहे. आता हा प्रकल्प पूर्ण होण्यासाठी अंदाजे 4 वर्षांचा कालावधी लागेल.
पुणे शहरात सध्या सुरू असलेल्या मेट्रो सेवेमुळं शहरांतर्गत दररोज प्रवास करणाऱ्या प्रवाशांना मोठा फायदा होत आहे. विद्यार्थी, नोकरदार वर्ग, कामगार यांना याचा मोठा फायदा होत असून महा मेट्रोला देखील यातून चांगलं उत्पन्न मिळत आहे. दरम्यान या दोन नव्या मार्किकांमुळे आयटी हब व्यावसायिक ठिकाण शैक्षणिक संस्था आणि निवासी ठिकण जोडली जाणार आहेत. तूर्तास इथंच थांबतोय ताज्या घडामोडींसाठी पाहत राहा टॉप न्यूज मराठी आपला महाराष्ट्र!आपली बातमी!
