Maharashtra ST Travel Scheme : राज्यातली गाव-खेडी, वाड्या वास्त्यांवर पोहोचणारी ‘लालपरी’ आता काळासोबत आपली पावलं पुढे टाकत आहे. सध्याच्या डिजिटल युगात इतर सेवांसोबत स्पर्धा करत एसटीने स्वतः ची कात टाकायला सुरुवात केली आहे. ST च्या ताफ्यात आता इलेक्ट्रिक वाहनांचा सुद्धा समावेश झाला आहे. एवढेच नाही तर आता STने टुरिझम क्षेत्रात सुद्धा पाऊल ठेवलं आहे. महाराष्ट्रातील पर्यटन स्थळांचा (Maharashtra ST Travel Scheme) आनंद आता कमी खर्चात घेता येणार आहे… काय आहे ST ची पर्यटन योजना? चला जाणून घेऊया
महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन मंडळाकडून नागरिकांकरिता खास पर्यटन योजना सुरू करण्यात आली आहे. यामध्ये प्रवास, जेवण आणि निवास हे सगळं देखील माफक दरात मिळणार आहे. त्यामुळे जर तुम्ही केवळ बजेटचा विचार करून तुमचा फिरायला जाण्याचा प्लॅन रद्द करीत असाल तर थांबा! कारण ST महामंडळाकडून अगदी कमी दरात महाराष्ट्रात पर्यटनाची संधी मिळणार आहे.
एसटी महामंडळाने खाजगी ट्रॅव्हल कंपन्यांच्या सहकाऱ्यांना महाराष्ट्रातील प्रमुख धार्मिक स्थळांसाठी सहलींचं आयोजन केलं आहे. विशेष म्हणजे या टूर पॅकेजेस मध्ये खाजगी टूर पॅकेजेस प्रमाणे राहण्या आणि जेवणाची सोय सुद्धा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. ही योजना सर्व वयोगटातील सामाजिक गटातील नागरिकांसाठी खुली असून सर्वजण याचा फायदा घेऊ शकतात.
स्वस्तात कराल प्रवास (Maharashtra ST Travel Scheme)
टूर करिता MSRTC च्या वेबसाईटवरून तिकीट आधीच बुक करता येतात.
अष्टविनायक दर्शन आणि इतर टूर पॅकेज तुम्ही निवडू शकता.
साध्या बसचा पर्याय उपलब्ध असून एसी बसच्या तुलनेत साध्या बसचे भाडे कमी आहे.
आपण या माध्यमातून फॅमिली आणि ग्रुप बुकिंग सुद्धा करू शकता.
कसे कराल बुकिंग?
ऑनलाइन बुकिंगसाठी MSRTC Reservation App डाऊनलोड करा किंवा msrtc.gov.in या संकेतस्थळाला भेट द्या.
इथे तुम्हाला जिथे जायचं आहे ते पॅकेज निवडा बसचा प्रकार निवडा आणि तिकीट बुक करा.
सध्या कोणती टूर उपलब्ध?
महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन मंडळाच्या वेबसाईटवर दिलेल्या माहितीनुसार सध्या श्रीवर्धन दिवेआगर आणि हरिहरेश्वर अशी सहल तुम्ही करू शकता. याकरिता प्रौढ व्यक्तींकरिता प्रतिव्यक्ती 333 रुपये तर 6 ते 12 वर्षीय मुलांकरिता 170 रुपये दर आकारला जातो आहे. यामध्ये सर्व्हिस टॅक्स आधीक आकारला जाईल.
श्री संत सोपानकाका पालखी सोहळा निमित्ताने वाहतूक बदलाबाबत जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश जारी
कोणत्या प्रेक्षणीय स्थळांना भेटी देता येणार?
या टूर पॅकेज अंतर्गत पळसे धबधबा, मुळशी धरण, ताम्हिणी घाट, दिवेआगर गणपती मंदिर, हरिहरेश्वर, भगवान शंकर आणि भगवान काळभैरव मंदिर श्रीवर्धन बीच. ही पर्यटन स्थळ पाहता येणार आहेत.
तर राज्यातील ‘लालपरी’ आता फक्त प्रवासापुरती मर्यादित राहिलेली नाही, तर पर्यटनाचा आनंद देणारी एक परवडणारी सोय बनलीये. कमी खर्चात महाराष्ट्रातील सुंदर प्रेक्षणीय स्थळांना भेट देण्याची संधी ST महामंडळ देत आहे. प्रवास, जेवण, राहण्याची योग्य व्यवस्था आणि विश्वासार्हता हे सगळं मिळून ‘स्वस्तात मस्त पर्यटन’ ही कल्पना आता वास्तवात उतरली आहे. तुम्हालाही जर या सहलींचा अनुभव घ्यायचा असेल, तर लगेच बुकिंग करा कारण ही ‘लालपरी’ आता तुम्हाला घेऊन जाणार आहे निसर्गाच्या कुशीत आणि महाराष्ट्राच्या समृद्ध वारशात.