PRAMOD KONDHARE: पुण्यात भाजप पदाधिकाऱ्याकडून महिला पोलीसाचा विनयभंग CCTV व्हायरल; अटक का नाही ?

265 0

PRAMOD KONDHARE: पुणे भाजपचे पदाधिकारी प्रमोद कोंढरे यांनी पुण्यातीलच एका पोलीस निरीक्षक महिलेचा विनयभंग केल्याचं प्रकरण समोर आलं आहे.

या धक्कादायक घटनेचा एक सीसीटीव्ही व्हिडिओ देखील हाती आला असून प्रमोद कोंढरे आणि त्यांच्यामुळे भाजप पक्षही आता अडचणीत आलाय.

यावर चित्रा वाघ, चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासह अनेक वरिष्ठांनी खेद व्यक्त करत चौकशीच्या सूचना दिल्या आहेत.

मात्र प्रमोद कोंढरे यांच्यावर नेमका आरोप काय ? आणि आत्तापर्यंत काय कारवाई झाली आहे पाहूया…

23 जून रोजी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी हे पुणे दौऱ्यावर होते.

TOP NEWS MARATHI: BJP PRAMOD KONDHRE CCTV: भाजपच्या प्रमोद कोंढरेंकडून महिला पोलिसांचा विनयभंग

पुण्यातील विविध कार्यक्रमांना त्यांनी हजेरी लावली. या दौऱ्या वेळी मोठा पोलीस बंदोबस्त लावण्यात आला होता.

कसबा परिसरात नितीन गडकरी हे पाहणी करण्यासाठी येणार असल्याने या महिला पोलीस निरीक्षक त्या ठिकाणी कर्तव्य बचावत होत्या.

त्या ठिकाणी कसब्याचे आमदार हेमंत रासने हे देखील उपस्थित होते. अचानक पाऊस येऊ लागल्याने

भाजपाचे अनेक कार्यकर्ते स्वतः आमदार रासने आणि या महिला पोलीस अधिकारी एका दुकानाच्या आडोशाला थांबले होते.

त्याचवेळी प्रमोद कोंढरे हे महिला पोलीस अधिकाऱ्याच्या अगदी जवळ येऊन थांबले. त्याचवेळी ते इतर कार्यकर्त्यांशी बोलताना देखील दिसले. ते पुन्हा त्या ठिकाणाहून बाजूला गेले व पुन्हा तिथेच येऊन थांबले.

दरम्यान ही गोष्ट महिला पोलीस अधिकाऱ्याला खटकल्यानंतरही त्यांनी कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही. केंद्रीय मंत्र्यांचा दौरा

असल्या कारणाने त्यांनी कोणतीही प्रतिक्रिया दिली असती किंवा या विरोधात आवाज उठवला असता तर त्याचा परिणाम पोलीस बंदोबस्तावर झाला असता.

त्यामुळे या महिलेने कुणाला काहीही न बोलता आपलं कर्तव्य बजावलं. मात्र त्यानंतर या महिलेने तक्रार देण्याचा प्रयत्न केल्यानंतर

भाजपच्या काही वरिष्ठांकडून त्यांच्यावर दबाव आणला गेल्याचा आरोप करण्यात आला आहे.

अर्थात या सगळ्या नंतर या महिलेने थेट पुणे पोलीस आयुक्तांकडे दाद मागितली.

व त्यांनी दिलेले आदेशानंतर या प्रकरणात गुन्हा दाखल करण्यात आला.

pune bjp omkar kadam: भाजपच्या ओंकार कदम आणि सहकाऱ्यांना मनपात प्रवेश नको; वैतागलेल्या प्रशासनाचा पोलिसांना पत्र

मात्र केवळ गुन्हा दाखल करणं पुरेसं नाही,

भाजपने पक्षांतर्गत कठोर कारवाई करायला हवी असे मत काँग्रेस नेत्या संगीता तिवारी यांनी व्यक्त केलंय.

प्रमोद कोंढरे यांची पक्षातून हकालपट्टी करण्याची मागणी संगीता तिवारी यांनी केली मात्र दुसरीकडे त्यांनी स्वतःच राजीनामा दिला असून पक्षाने हा राजीनामा स्वीकारला देखील आहे.

मात्र भाजपचे कार्यकर्ते पदाधिकारी यांच्यावर महिलांची अदबीने वागण्याचे संस्कार आहेत, अशी प्रतिक्रिया भाजपचे शहराध्यक्ष धीरज घाटे यांनी दिली आहे.

हे सगळे आरोप खोडून काढत प्रमोद कोंढरे यांनी एक पत्रक जाहीर केलं.

गर्दी असल्याने अनवधानाने पोलीस अधिकाऱ्याला स्पर्श झाला असेल, आपण जाणून-बुजून हे केलेलं नाही,

असंच स्पष्टीकरण कोंढरे यांनी दिलं. मात्र जर चुकून स्पर्श झाला असेल तर माफी मागून बाजूला होणं गरजेचं होतं.

महिला पोलिसाला लज्जा उत्पन्न होईल अशा स्थितीत थांबायचच का हा सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न उपस्थित होतो.

दरम्यान या प्रकरणात अद्यापही कोंढरे यांना अटक झालेली नाही. पोलिसांनी त्यांना केवळ ताब्यात घेऊन चौकशी केली असल्याची माहिती समोर येत आहेत.

त्यामुळे महिला पोलीस अधिकाऱ्याला ही न्यायासाठी झगडावं लागत असेल तर सर्वसामान्य महिलांचं काय ? हा प्रश्न संपूर्ण महाराष्ट्राला पडलाय.

Share This News
error: Content is protected !!