MALEGAON SUGAR FACTORY: संपूर्ण राज्याचं लक्ष लागलेल्या बारामतीतील माळेगाव सहकारी साखर कारखाना निवडणूकीची
आज मतमोजणी होत असून आता पहिला निकाल हाती आला आहे.
माळेगाव सहकारी साखर कारखाना निवडणूक, उपमुख्यमंत्री अजित पवार विजयी
ब वर्ग गटात राज्याचे उपमुख्यमंत्री तथा पुणे, बीड जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार विजयी झाले आहेत.
अजित पवारांना 91 मतं मिळाली तर विरुद्ध बळीराजा सहकार बचाव पॅनलच्या भालचंद्र देवकाते यांना अवघी 10 मतं मिळाली आहेत.
AIMIM: विशेष संपादकीय! ‘एमआयएम’चं ‘कटी पतंग’ सुरूच! एक पतंग उडाला, 16 कटले!
माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीच्या मतदानाची आकडेवारी सकाळी सात ते सायंकाळी सहा वाजेपर्यंत अ वर्गाची 88.48 टक्के मतदान झाले असून यामध्ये 12 हजार 862 पुरुषांनी मतदानाचा हक्क बजावला.
तर 4 हजार 434 स्त्रियांनी मतदानाचा हक्क बजावला आहे. 19 हजार 549 पैकी एकूण 17 हजार 296 मतदारांनी आपल्या मतदानाचा हक्क बजावलाय.
तर ब प्रवर्गात 99.02 टक्के मतदान झाले आहे. 102 मतदारांनीपैकी यामध्ये 99 पुरुष आणि 2 स्त्रियांनी आपल्या मतदानाचा हक्क बजावला आहे.
शरद पवार आणि अजित पवार यांच्यासह शरद पवारांचे जुने सहकारी चंद्रराव तावरे यांच आणि शेतकरी संघटनांच अशी मिळून चार पॅनेल्स मैदानात आहेत.
TUKARAM MAHARAJ PALKHI PRASTHAN:विठुनामाच्या घोषात श्री संत तुकाराम महाराज पालखीचे प्रस्थान
PUNE DEEPAK MANKAR SON | दीपक मानकरांच्या मुलासह व्याह्यावर गुन्हा दाखल; काय आहे प्रकरण?