Pune Crime News : व्हिडिओ बनवून तरुणाची आत्महत्या ; नेमकं कारण काय ?

261 0

Pune Crime News : ज्या प्रमाणे इतर लोक मरतात तसा मी ही मरेल.. माझ्या आई- वडिलांना एवढंच सांगायचं आहे की, माझ्या बहिणींना कुणी त्रास देऊ नका, मी विष प्यायलो आहे, लोकेशन पाठवतो, माझा मृतदेह घेऊन जा’ असं म्हणत 18 वर्षीय तरुणाने आत्महत्या केली. तब्बल पाच दिवसानंतर त्याचा मृतदेह सापडला असून आत्महत्येपूर्वी बनवलेला एक व्हिडिओ (Pune Crime News) देखील समोर आलाय.

Expensive Number Plate : गाडी 1 लाखाची आणि नंबर प्लेट 14 लाखांची

संजय कुमार राजपूत असं या तरुणाचं नाव होतं. तो त्याच्या कुटुंबीयांबरोबर पिंपरी चिंचवड परिसरात वास्तव्यास होता. 17 जून पासून तो राहत्या घरून बेपत्ता झाला होता. तशी तक्रारही देहूरोड पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली होती. त्याचा शोध घेत असताना अखेर शनिवारी त्याचा मृतदेह घोरावडेश्वर डोंगराच्या पायथ्याशी आढळून आला आहे. त्याचबरोबर मृतदेहाच्या जवळ विषारी औषधाची बाटली आढळली आहे. यावरून त्याने आत्महत्या केल्याचं निष्पन्न झालं असून आत्महत्या पूर्वी बनवलेला एक व्हिडिओ आणि सुसाईड व्हॉइस नोट ही समोर आली आहे. त्याने ही व्हॉइस नोट त्याच्या (Pune Crime News)  आईला पाठवली होती. त्याने मृत्यूपूर्वी बनवलेल्या व्हिडिओत नेमकं काय म्हटलंय पाहूया..

संजयकुमारनं विष प्राशन करून आत्महत्या केल्याचं शवविच्छेदन अहवालात म्हटल आहे. त्यानं हे विषारी औषध ऑनलाइन मागवलं होतं. त्यानंतर त्याने एक व्हिडिओ आणि एक ऑडिओ रेकॉर्ड केला. त्यानंतर हे टोकाचं पाऊल उचललं. मात्र या व्हिडिओमध्ये तो आपल्या बहिणींबद्दल अतिशय आत्मीयतेने बोलताना पाहायला मिळत आहे. ‘माझ्या दोन्ही बहिणी माझं सर्वस्व आहेत, मला त्यांची प्रचंड काळजी वाटते. माझ्या आई-वडिलांना विनंती आहे की त्यांना चांगलं शिक्षण द्या, त्यांचा नीट सांभाळ करा. यापेक्षा जास्त मी काही बोलू शकत नाहीत’, असं म्हणत कुटुंबीयांवर असलेलं त्याचं प्रेम या व्हिडिओच्या माध्यमातून दिसून येत आहे. मात्र त्याने आत्महत्या का केली याचं कारण अद्यापही स्पष्ट झालेलं नाही.

TOP NEWS MARATHI : NEELAM GORHE ON ABU AAZMI : अबू आझमी हिंदूंना काफिर मानतात, त्यामुळेच हा द्वेष

संजय कुमार यांनीही आत्महत्या नैराश्यतून केल्याचं बोललं जात आहेत. मात्र त्याला कोणत्या गोष्टीचं नैराश्य होतं, याविषयी कुठलीही माहिती मिळाली नसून पोलिसांकडून तपास सुरू आहेत. एकीकडे नैराश्यातून तरुणांच्या होणाऱ्या आत्महत्या हा चिंतेचा विषय बनला असून दुसरीकडे या प्रकरणानंतर ऑनलाईन मिळणारी ही विषारी औषध हा गंभीर विषय लक्षात येत आहे. राज्यातील मेडिकल स्टोअरमध्ये प्रेस्क्रीप्शन शिवाय कोणतीही औषधं दिली जात नाहीत. त्यामध्ये विषारी औषध, झोपेच्या गोळ्या हे तर डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय अजिबात दिल जात नाही. मात्र प्रेस्क्रीप्शन शिवाय ऑनलाइन औषध मिळत असल्याचं आढळलं असून मेडिकल स्टोअर्सलाच्या नियमावली लावण्यात आल्या आहेत तसेच नियम ऑनलाइन औषध विक्री करणाऱ्या ॲप आणि वेबसाईट्सलाही असले पाहिजेत, हे गरजेचं झालंय.

Share This News
error: Content is protected !!