Revati Nile suicide Case: मांत्रिकाच्या छळाला कंटाळून तरुणीची आत्महत्या

668 0

Revati Nile suicide Case:पुरोगामी महाराष्ट्रात 19 वर्षीय तरुणीने मांत्रिकाच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या केल्याची घटना घडली आहे.

ही घटना कुठल्या एखाद्या खेडेगावात किंवा वाड्या वस्तीतली नाही तर ही घटना मुंबईतल्या वसई मध्ये घडलिये.

त्यामुळेच अनेकांनी भुवया उंचावल्यात.

एवढेच नाही तर यामध्ये राजकीय हस्तक्षेप आणि दबाव असल्यामुळे कारवाई होत नसल्याचा

मृत व्यक्तीच्या कुटुंबीयांची माहिती आहे. चला जाणून घेऊया नक्की काय आहे हे प्रकरण ?

TOP NEWS MARATHI | Revati Nile suicide Case: मांत्रिकाच्या छळाला कंटाळून तरुणीची आत्महत्या

खरंतर 19 वर्ष रेवती निळे या तरुणीने 28 एप्रिल 2025 रोजी विष पिऊन आत्महत्या केली होती.

वसईतल्या मांत्रिकाकडून होणाऱ्या त्रासाला कंटाळून तिने आत्महत्या केली असल्याचं बोललं जातंय…

या मांत्रिकाचं नाव अजय राणा . आता या मांत्रिकेचा मुलगा आयुष राणा याच्याशी रेवतीचे प्रेम संबंध होते.

मात्र तुझ्या कुंडलीमध्ये मृत्यू योग आहे तू खालच्या जातीची आहेस

त्यामुळे माझ्या मुलासोबत तुझं लग्न होऊ शकत नाही असं अजय राणा याने रेवती आणि आयुष यांच्याबाबत सांगितलं होतं.

SHIRDI CRIME: साईनगरी बनली गुन्हेनगरी! आधी खून मग बर्थडे पार्टी; शिर्डीत अल्पवयीन टोळक्याचा राडा

आणि याच कारणानं नैराश्यात येऊन रेवतीने आत्महत्या केली होती असा आरोप रेवतिच्या कुटुंबीयांनी केलाय.

खरं तर पोलिसांनी या आत्महत्या प्रकरणाबाबत तपास करणे गरजेचं असताना उलट

पोलीस आम्हालाच त्रास देत आहेत असा आरोप मृत तरुणीच्या कुटुंबियांनी केला आहे.

वसई पोलीस ठाण्यात मांत्रिक आणि त्याच्या मुलाच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

गुन्हा दाखल केल्यानंतरही वसई पोलिसांनी योग्य ती कारवाई केली नाही.

शिवसेना शिंदे गटाचे जिल्हाप्रमुख निलेश तेंडुलकर यांनी राजकीय दबाव आणला

म्हणून पोलिसांनी मयत तरुणीच्या कुटुंबाला न्याय दिला नाही असा आरोप करण्यात आला आहे.

आता आणखी एक धक्कादायक माहिती म्हणजे मांत्रिक अजय राणा.

हा मांत्रिक अजय राणा वसईच्या किल्ल्यात असलेल्या मंदिरात अनधिकृतपणे ठाण मारून जादूटोणा करतो अशी माहिती आहे.

Madarsa Murder Case Maharashtra : सुटीच्या हव्यासात घेतला जीव ! कोल्हापुरात अल्पवयीन मुलाकडून 11 वर्षीय विद्यार्थ्याची निर्घृण हत्या

पोलिसात त्याचे चांगले संबंध असल्यामुळे पोलीसही त्याच्यावर काही कारवाई करत नाहीत असे देखील आरोप होतायत.

अशाप्रकारे ऐतिहासिक वास्तूमध्ये जादूटोणासारखा प्रकार करण्याची हिम्मतच कशी झाली? असा सवालही उपस्थित होतोय.

हे प्रकरण एवढयावरच थांबलं नसून या प्रकरणामध्ये सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी देखील उडी घेतलीये.

स्वतः अंजली दमानिया यांनी निलेश तेंडुलकर यांना पोलीस ठाण्यात बोलवून पोलिसांसमोर दबाव आणला होता का ?

याचा जाबही विचारलाय, त्यावर “या प्रकरणात माझा कोणताही संबंध नाही मी या दोन्ही पार्टीला ओळखत सुद्धा नाही असं तेंडुलकर यांनी सांगितलय”.

रेवतीच्या कुटुंबाला न्याय मिळवून देण्यासाठी मी वसईत आले आणि न्याय मिळेपर्यंत मी लढणार असं सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी सांगितलय.

Share This News
error: Content is protected !!